बेनोनी(दक्षिण आफ्रिका): १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पाच वेळा चॅम्पियन असलेल्या भारताचा पराभव झाला. भारताच्या या संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी या पराभवानंतर एक मोठे वक्तव्य केले आहे. कानिटकरांच्या मते या संघातील काही खेळाडू भविष्यात टीम इंडियाकडून खेळतील. काल रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप आणि आता १९ वर्षाखालील वर्ल्डकप अशा ३ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात भारताचा पराभव झालाय.

अंतिम सामन्यातील पराभवानंतर कानिटकर म्हणाले, या संघात असे काही खेळाडू आहेत. ज्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सौम्य पांडे आणि सचिन धस यांची कामगिरी संपूर्ण स्पर्धेत चांगली झाली आहे. या खेळाडूंची कामगिरी पाहिल्यानंतर निश्चितपणे भारताचे भविष्य उज्वल आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे.

वर्ल्डकपमध्ये या खेळाडूंनी अवघड परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे, ही गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी चांगले संकेत आहेत. उदय पंजाबकडून खेळतो. त्याने वर्ल्डकपमध्ये ३९७ धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानी आहे. त्याने नेपाळविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर सेमीफायनलमध्ये ८१ धावांची विजयी खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज मुशीर मुंबईकडून खेळतो. त्याचा मोठा भाऊ सरफराज खान देखील आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मुशीरने सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने स्पर्धेत ३६० धावा केल्या.

या दोघांशिवाय फिनिशरच्या भूमिकेत असलेला धसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजीसोबत त्याने गोलंदाजीत १८ विकेट घेतल्या. महाराष्ट्राच्या सचिन धसने जी कामगिरी केली आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये गरजेची असते. भारतीय संघ नेहमीच १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये पॉवरहाऊस ठरला आहे. विराट कोहली, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे सर्व स्टार १९ वर्षाखालील वर्ल्डकपमधूनच मिळाले आहेत.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला दिसतोय पराभव; भारताविरुद्ध लढू पण या एका गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करणे अशक्य
अनेकदा खेळाडू आयपीएल किंवा भारतीय संघात चांगली कामगिरी करतात. मला विश्वास आहे की, या संघातील काही खेळाडू भाारतीय संघात खेळतील. अर्थात त्यासाठी मोठी स्पर्धा असेल. या संघातील अर्शिन कुलकर्णी आणि अविनाश राव यांना आयपीएलमध्ये स्थान मिळाले. १९ वर्षाखालील वर्ल्डकप खेळल्यामुळे खेळाडूंना सिनिअर स्तरावर कसे खेळतात हे समजते, असे कानिटकर म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *