निलेश पाटील, जळगाव : एकीकडे कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. दुसरीकडे हरभऱ्यासह तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. जळगावच्या कृषी उत्पन्न समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली असून, आठवडाभरातच हरभऱ्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ५,७०० रुपयांवर असलेले हरभऱ्याचे दर ६ हजारच्या पुढे गेले असून, बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा दर ६१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. दररोज बाजार समितीत ८०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली. आठवडाभरातच हरभऱ्याच्या भावात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा दर ६१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजेच हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ६०० ते ७०० रुपयापर्यंतचा अधिकचा भाव मिळत आहे. तुरीला देखील हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जळगाव बाजार समितीत रब्बी हंगामातील धान्य खरेदीच्या पहिल्याच दिवशी हरभऱ्याला ५,८०० रुपयांचा भाव मिळाला होता. सध्या बाजार समितीमध्ये तुरीची आवकदेखील कायम असून, तुरीचे दर १० हजार रुपयांवर स्थिर आहेत. हरभऱ्याला मागणी कायम असल्याने आगामी काही दिवसांत हरभऱ्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्यावर्षी हरभऱ्याचे उत्पादन जास्त असल्यामुळे भाव कमी होता. मात्र, यावर्षी उत्पादन कमी व भाव जास्त अशी परिस्थिती आहे गेल्या वर्षी सरकारी खरेदी सुरूहोती आणि त्यांच्याकडे साठा जास्त असल्यामुळे ४७०० ते ५२०० पर्यंत भाव गेल्या वर्षी मिळत होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हरभरा उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी भाव चांगला शेतकऱ्यांना मिळत आहे. ६३९० रुपयापर्यंत उत्तम दर्जाचा हरभरा खरेदी केला गेला अशी माहिती बाजार समिती असोसिएशनचे सचिव सुनील तापडिया यांनी दिली.
Read Latest Maharashtra News And Marathi News

मागच्या वेळी हरभऱ्याचे उत्पन्न महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, गुजरात,मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात उत्पन्न झाले होते. सरकारने मागील वर्षी चांगल्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी केली होती. मात्र, यंदा सरकारकडे संपूर्ण हरभऱ्याचा साठा शिल्लक असल्यामुळे आणि यावर्षी हरभऱ्याचे उत्पन्न कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना भाव चांगल्या प्रमाणात मिळत आहे, अशी माहिती विष्णुकांत मणियार यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *