क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू नासिर हुसैनसह एकूण ८ जणांची नावे त्यात समाविष्ट आहेत. यामध्ये क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांचाही समावेश आहे. आयसीसीने नासिर हुसेनवर कलम २.४.४, कलम २.४.४ आणि कलम २.४.६ लादले आहे. या अंतर्गत आरोप करण्यात आले असून त्यात क्रिकेट स्पर्धा खेळताना काही भेटवस्तू मिळाल्याचा दावा करण्यात आला असून त्याबाबतची माहिती लपवण्यात आली आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, या सर्व गोष्टी अबू धाबी टी-10 लीगच्या २०२१ च्या सीझनमध्ये घडल्या होत्या.
संघवी यांच्यावर सामन्याच्या निकालावर आणि अन्य बाबींवर सट्टा लावण्याचा आणि तपास यंत्रणेला सहकार्य न केल्याचा आरोप आहे. कृष्ण कुमारवर DACO पासून गोष्टी लपवल्याचा आरोप आहे तर धिल्लोनवर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बांगलादेशसाठी १९ कसोटी आणि ६५ एकदिवसीय सामने खेळलेल्या नसीरवर DACO ला ७५० डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तूंची माहिती उघड न केल्याचा आरोप आहे.
निलंबित करण्यात आलेल्या इतरांमध्ये फलंदाजी प्रशिक्षक अझहर झैदी, यूएईचे देशांतर्गत खेळाडू रिझवान जावेद आणि सलिया सामन आणि संघ व्यवस्थापक शादाब अहमद यांचा समावेश आहे. तीन भारतीयांसह सहा जणांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे आणि या सर्वांना आरोपांना उत्तर देण्यासाठी मंगळवारपासून १९ दिवसांचा कालावधी असेल. टूर्नामेंट आयोजकांनी नंतर या प्रकरणावर निराशा व्यक्त करून आणि आगामी हंगामात अधिक सावधगिरी बाळगण्याचे आश्वासन दिले.