[ad_1]

नवी मुंबई : शहरामध्ये अपघातांचं सत्र हे थांबायचं नाव घेताना दिसत नाही. ट्रक चालकाने यूटर्न घेताना रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

अनेक वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांना निमंत्रण मिळतं. पनवेल येथील नावडे ब्रिजकडे जाणाऱ्या तळोजा रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकाला आपल्या जीवाला मुकावे लागले असून प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

अवघ्या तीन सेकंदात होत्याचं नव्हतं, Sports Bike अपघातात पिंपरीचा चिमुकला ब्रेन डेड, कुटुंबाच्या निर्णयाने सात आयुष्य उजळली
ट्रक चालकाने यूटर्न घेताना रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरुन ताबडतोब फरार झाला असल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडला नाही. मात्र ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

आजोळी आलेल्या चिमुकल्यासोबत आक्रित, गरम दुधाच्या कढईत पडल्याने भाजून मृत्यू
पनवेल शहरामध्ये वाढत्या अपघातांमुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल येथील आयजीपीएल ते नावडे ब्रिजकडे जाणाऱ्या तळोजा एम आय डी सी रोडवर एस एस पाटील कन्स्ट्रक्शनच्या बाजूला असलेल्या ऑफिस जवळ हा भीषण अपघात झाला.

नाग डसल्याने लेक गेली, कुटुंबाचा धीरोदात्तपणा, पंचक्रिया विधीला फाटा, सर्पदंश जागृती अभियान
या अपघातामध्ये ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे उमेश पाटील याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षामधील एक व्यक्ती जखमी झाली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीषण अपघातामधील ट्रक चालक फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

आमदार अभिमन्यू पवारांच्या माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्तांना स्वत: च्या गाडीतून रुग्णालयात नेलं

वाहतूक पोलीस वारंवार वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे आवर्जून सांगत असतात, मात्र अनेकांना गाडी चालवताना जास्तीची घाई झालेली असते, त्यात वाहने चालवताना भरधाव वेगाने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे अनेक वेळा अपघात घडून चूक नसतानाही काही प्रवाशांना जीवाला मुकावे लागते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *