बेनोनी (दक्षिण आफ्रिका): ICC अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी ११ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. विलोमूर पार्क, बेनोनी येथे भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहेत. भारताने पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले. बेनोनीच्या खेळपट्टीवर (Benoni Pitch Report), गोलंदाज की फलंदाज कोणाला अधिक मदत मिळेल जाणून घ्या.

संपूर्ण टूर्नामेंटमध्ये दोन्ही संघांनी आपल्या खेळाने छाप पाडली आहे. अंडर-19 विश्वचषकात भारत हा सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरलेला संघ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे तर भारतीय संघ कायमच वरचढ राहिला आहे. अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना उभय संघांमध्ये तिसऱ्यांदा खेळवला जाणार आहे. यापूर्वी २०१२ आणि २०१८ मध्ये दोन्ही संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरले होते आणि दोन्ही वेळा भारत चॅम्पियन बनला होता. आता कांगारू संघाविरुद्ध जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी भारताकडे आहे.

पिच रिपोर्ट

विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावणार आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला या मैदानावर विशेष फायदा होतो. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. प्रथम गोलंदाजी करत मोठे प्रतिस्पर्धी संघाला स्वस्तात बाद करत विजयासाठी सोपे लक्ष्य मिळवेल.

अंतिम फेरीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ

भारतीय संघ :

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी, प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन

ऑस्ट्रेलिया संघ :
रायन हिक्स (विकेटकीपर), लचलान एटकेन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महाली बियर्डमन, हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, राफे मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, कॅलम विडलर, कोरी वॉस्ले, ह्यू वायबगेन, टॉम कॅम्पबेल, एडन ओ. कॉनर, ऑलिव्हर पीकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *