[ad_1]

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर करणार आहे. मात्र, यंदाच्या अंतरिम बजेट सादर होण्यापूर्वीच सरकारने एक अशी भेट दिली आहे, जी सामान्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. देशात तयार करण्यासाठी वापरले जाणारे पार्ट बाहेरून मागवले जातात. अशा परिस्थितीत त्यांची किंमत इतकी वाढते की परवडणारे फोनही खरेदी करणे कठीण होते. मात्र, सरकारने याबाबत मोठी घोषणा केली ज्यामुळे आता सर्वप्रकारचे फोन स्वस्त होतील. मोबाईल फोन निर्मिती आणि संबंधित कंपन्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मोबाईल पार्टसच्या आयात शुल्कात कपातकेंद्रातील मोदी सरकारने अर्थसंकल्पूर्वी मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केले असून आता १५% ऐवजी फक्त १०% शुल्क आकारले जाईल. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः निर्यात वाढवण्यासाठी भारत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणते मोबाईल पार्ट्सवर आयात शुल्क कमी केले

  • बॅटरी कव्हर
  • मुख्य लेन्स
  • बॅक कव्हर
  • प्लास्टिक
  • धातू
  • सिम सॉकेट
  • मेटल पार्ट्स
  • सेल्युलर मॉड्यूल
  • यांत्रिक (मेकॅनिकल) वस्तू

या सर्व भागांव्यतिरिक्त इतर भागांवरील आयात शुल्क कमी करण्यात आले असून आता सर्व १०% शुल्कासह उपलब्ध होतील. म्हणजेच सरकारच्या या निर्णयानंतर भारतात उपलब्ध होणारे आगामी स्मार्टफोन आणखी स्वस्त होऊ शकतात. सरकारकडून मोबाईल स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क कमीकाही दिवसांपूर्वी, ११ जानेवारीला रकार प्रीमियम मोबाइल फोन बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याचेही वृत्त सामोर आले होते. दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने बातमी समोर आलेली. म्हणजे जास्त किमतीचे फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक वस्तू भारतात आल्यावर कमी टॅक्स भरावा लागेल. सरकारच्या या निर्णयाचा ॲपलसारख्या कंपन्यांना फायदा होईल आणि भारतातून अधिक फोन परदेशात पाठवले जाऊ शकतील, ज्यामुळे देशाची कमाई वाढेल, अशी अपेक्षा आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *