नागपूर : काँग्रेसला आज सोमवारी मोठा झटका बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला. चव्हाण यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे १३ आमदारही पक्षाला अलविदा करू शकतात. या चर्चांमध्येच कॉंग्रेसचे नागपूर शहर व जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे हेही आउट ऑफ कव्हरेज झाले असून, त्यानंतर ठाकरेही पक्ष सोडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.विकास ठाकरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीअशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे समर्थक १३ आमदारही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे हेही आऊट ऑफ कव्हरेज झाले आहेत. काँग्रेसचे नेते सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तसे होत नाही. त्यानंतर विकास ठाकरे यांनीही काँग्रेस सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.यांच्या नावाची चर्चाअशोक चव्हाण यांच्यासह सुमारे १३ नेते काँग्रेस सोडण्याच्या विचारात असल्याचा चर्चा सुरू आहे. यामध्ये आमदार विश्वजित कदम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमित देशमुख आणि धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, जितेश अंतापूरकर, सुरेश वरपुडकर, विकास ठाकरे, कैलास गौरंट्याल, संजय जगताप आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.पक्ष सोडणार सोडण्याच्या चर्चेला तथ्य नाहीअशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही काँग्रेसला अलविदा करणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, याबाबतच्या चर्चेत तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनीच स्पष्ट केलं आहे. ”अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याने माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. माझे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे मीही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेत तथ्य नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *