गोपाळ गुरव : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात ब्राझील फुटबॉल संघ अपयशी ठरला आहे. ब्राझीलला रविवारी रात्री पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाविरुद्ध ०-१ अशी हार पत्करावी लागली. रिओ दी जानेरो (२०१६) आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये (२०२०) ब्राझीलने विजेतेपद जिंकले होते. मात्र, त्यांना व्हेनेझुएलात झालेल्या दक्षिण अमेरिकन टप्प्याच्या निर्णायक साखळीत अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्यात अपयश आले.

पॅराग्वेने व्हेनेझुएलात झालेल्या या साखळीत अव्वल क्रमांक मिळवला. त्यांनी रविवारी व्हेनेझुएलाचा २-० असा पराभव करून अव्वल स्थान निश्चित केले. पॅराग्वेने त्यापूर्वी ब्राझीलचा पराभव केला होता. त्यांचे एकूण सात गुण झाले. अर्जेंटिनाने ब्राझीलला पराभूत करून पाच गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. ब्राझीलला केवळ व्हेनेझुएला संघालाच पराभूत करण्यात यश आले. ब्राझील यापूर्वी २००४ च्या स्पर्धेस पात्र ठरले नव्हते. पॅराग्वे आणि अर्जेंटिना लढत बरोबरीत सुटली. ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेत २३ वर्षांखालील संघ असतात. त्यांच्या साथीला दोन वरिष्ठ खेळाडू निवडता येतात.

अर्जेंटिनाने ब्राझीलविरुद्ध सुरुवातीपासून वर्चस्व राखले. ब्राझीलने केवळ बचावास प्राधान्य दिल्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत क्वचितच चुरस दिसली. त्यांनी ६१व्या मिनिटाला गोलचा एकमेव प्रयत्न केला होता. त्यानंतर १७ मिनिटांनी जेव्हियर मॅशेरानो याने हेडरवर केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने बाजी मारली. ‘आम्ही पात्रता मिळवणे योग्यच होते. आम्ही स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. आम्ही गोल करण्यासाठी प्रतीक्षा केली आणि निर्णायक गोल करण्यात यश मिळवले,’ असे अर्जेंटिनाचा अव्वल आक्रमक ल्युसिआनो गाँदोऊ याने सांगितले. त्याने अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत चार गोल केले.

अर्जेंटिनाने यापूर्वी दोन ऑलिम्पिक स्पर्धांत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी २००४च्या अथेन्स; तसेच २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी केली होती. बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळी मेस्सी अर्जेंटिनाचा कर्णधार होता. पॅराग्वेने ऑलिम्पिकमध्ये खूपच कमी पदके जिंकली आहेत. त्यातील एक फुटबॉल संघाचे आहे. पॅराग्वेने २००४च्या ऑलिम्पिक फुटबॉलच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभूत झाले होते.

…जेव्हा विराट फुटबॉल खेळतो; डेव्हिड बेकहॅमने शेअर केला व्हिडिओ

ब्राझीलचा मध्यरक्षक आंद्रे सँतोसने सांगितले की, ” आम्ही कमालीचे निराश आहोत. या स्पर्धेसाठी चांगली पूर्वतयारी केली होती. मात्र अंतिम टप्प्यात चेंडूवर नियंत्रण राखण्यातच आम्हाला यश आले नाही. “Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *