वॉशिंग्टन: जगभरात अनेक ठिकाणी गुडविल स्टोअर्स आहेत. जिथे गरिबांसाठी काही दान करून पुण्याचं काम करता येतं. येथे दानपेट्या देखील आहेत ज्यात आवश्यक वस्तू किंवा पैसे तुम्ही दान करु शकता. नंतर ही सामग्री लोकांना अगदी स्वस्त दरात किंवा अगदी विनामूल्यही दिली जाते. अमेरिकेतील गुडविल स्टोअरमध्ये नुकतेच जे घडलं ते भयंकर होते.

जेव्हा दानपेटी उघडली तेव्हा पाहणाऱ्यांना धक्काच बसला.

साधारणत: दानपेट्या उघडल्यानंतर त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूंचा उपयोग धर्मादाय कामासाठी केला जातो. मात्र, एके दिवशी या गुडविल स्टोअर्समधली दानपेटी उघडली असता दुकान मालकाला धक्काच बसला. हा प्रकार पाहताच त्यांनी पोलिसांना बोलावलं. ती ना घरातील वस्तू होती, ना अन्न, ना पैसा.. ती होती एक मानवी कवटी.

उत्खननात मुलीला सापडला १५०० वर्ष जुना जादूचा आरसा, पाहा कसा दिसायचा, वापर ऐकून चक्रावाल
टॅक्सीडर्मिड वस्तूंच्या कंटेनरमध्ये कवटी

५ सप्टेंबर रोजी दुकानात ही कवटी सापडली होती. ती कवटी स्थानिक अधिकाऱ्यांनी जप्त केली. तसेच, ही कवटी कोणत्या रक्तपाताचा परिणाम तर नाही ना याचीही खात्री करण्यासाठी त्यांनी चौकशीही केली. ही कवटी इतर टॅक्सीडर्मिड वस्तूंच्या कंटेनरमध्ये असल्याचे आढळून आले. ही कवटी कोणाची आहे हे ओळखणं अत्यंत कठीण आहे.

गुडइयर पोलिस विभागाने शेअर केलेल्या फोटोमध्ये वरच्या बाजूला काही दात असलेली तपकिरी कवटी आणि डावीकडे खोटा डोळा दिसत आहे. ते खूपच भयानक दिसत होते. दोन नियमित खरेदीदारांनी स्थानिकांनी सांगितले की, “हे धडकी भरवणारा आहे, आम्ही येथे नेहमीच येतो.”

Millionaire Lost Everything: एका रात्रीत कोट्यधीश झाला, पण एक चूक अन् थेट रस्त्यावर आला
फॉरेन्सिक तपासणीसाठी काहीही शिल्लक राहिले नाही

गुडइयर पोलिसांनी सांगितले की, “वैद्यकीय तपास कार्यालयाशी बोलल्यानंतर असे दिसून आले की ही मानवी कवटी खूप जुनी आहे आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी त्यात काहीही शिल्लक नाही.” ते पुढे म्हणाले, “या प्रकरणाबाबत बरेच प्रश्न विचारले जात आहेत. जसे की, ती कवटी कोणाची होती? कोणी आणली? दानपेटी जवळ कॅमेरे होते का? काय झाले याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.”

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

अमेरिकेतील ऍरिझोना येथील सरिवल अव्हेन्यू आणि युमा रोडजवळ असलेल्या स्टोअरमधील आणखी एक नियमित खरेदीदार म्हणाला: “मला येथे इतके विचित्र काहीही कधीच आढळले नाही. हे खरोखरच भयानक आहे.”

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *