नासानं शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट २०२३ रोजी उतरलं होतं. ते ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी अंतरावर आहे. आमच्या एलआरओ म्हणजेच लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिरटरमध्ये लावण्यात आलेल्या LROC म्हणजेच एलआरओ कॅमेऱ्यानं चांद्रयान ३ च्या लँडिंग साईटचा ओबलीक व्यू टिपला असल्याचं नासानं म्हटलं आहे. ओबलीक व्यू म्हणजेच ४२ डिग्री स्लिव अँगल होय. हा फोटो चांद्रयान ३ चंद्रावर उतरल्यानंतर चार दिवसानंतर टिपण्यात आला आहे.
नासाचं ट्विट
.@NASA‘s LRO spacecraft recently imaged the Chandrayaan-3 lander on the Moon’s surface.
The ISRO (Indian Space Research Organization) Chandrayaan-3 touched down on Aug. 23, 2023, about 600 kilometers from the Moon’s South Pole.
MORE >> https://t.co/phmOblRlGO pic.twitter.com/CyhFrnvTjT
— NASA Marshall (@NASA_Marshall) September 5, 2023
विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरलं तिथं चारी बाजूला पांढरा रँग दिसतोय. लँडरच्या इंजिनमुळं धूळ बाजूला गेल्याचं नासानं म्हटलं आहे. LRO ला नासा गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरद्वारे संचलित करते.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर संध्या चंद्रावर पूर्णपणे अंधारात गेलेले आहेत. इस्त्रोनं प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडरचे सर्व पेलोडस बंद केले असून फक्त रिसीवर सुरु ठेवले आहेत. आता पुढील १४ दिवस चंद्रावर रात्र असेल. या दिवसांनंतर २२ सप्टेंबरला चंद्रावर दिवस होणार आहे.
चंद्रावर रात्रीच्या काळात तापमान खूप कमी होतं. त्यामुळं विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर कमी तापमानात तग धरू शकले तर २२ सप्टेंबरला ते पुन्हा सक्रीय होऊ शकतील, अशी आशा इस्त्रोला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या काळात तापमान उणे २५० अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. या तापमानात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर टिकून राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.