[ad_1]

नवी दिल्ली : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आता आणखी एका भारतीय कफ सिरप (पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइन) बाबत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी इराकमधील कॉमन कोल्ड सिरपच्या बॅचचा नमुना तपासला. यामध्ये भारतात बनवलेल्या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळून आले असून ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. बॅचमधील सिरपमध्ये )०.२५ टक्के डायथिलीन ग्लायकॉल आणि २.१ टक्के इथिलीन ग्लायकॉल होते.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, WHO ने सोमवारी सांगितले की हे सिरप फोरर्ट्स (इंडिया) लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडने DabiLife Pharma Pvt Ltd साठी तयार केले आहे. ते म्हणाले की एका सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल या दोन्हींची निर्धारित मर्यादा ०.१० टक्क्यांपर्यंत आहे. इतकंच नाहीतर उत्पादक-विक्रेत्याने उत्पादनाबाबत डब्ल्यूएचओला सुरक्षितता आणि गुणवत्तेची कोणतीही हमी दिलेली नाही.

सिरप वापरू नका, यामुळे मृत्यू होऊ शकतो

हे कफ सिरप वापरणं असुरक्षित असल्याची माहिती डब्ल्यूएचओकडून देण्यात आली आहे. कारण याच्या वापराने एखाद्याचं आरोग्य गंभीरपणं बिघडू शकतं किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. सध्या या संदर्भात कंपन्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

डब्ल्यूएचओने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, हरियाणामध्ये निर्मित मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडची चार उत्पादनेही छाननीखाली आहेत. त्याच वेळी, डिसेंबर २०२२ मध्ये, WHO ने यूपीमध्ये बनवल्या जाणार्‍या बायोटेक प्रायव्हेटच्या दोन उत्पादनांबाबत अलर्ट जारी केला होता. पंजाबमध्ये उत्पादित क्यूपी फार्माकेम लिमिटेड द्वारा निर्मित खोकला सिरपला या वर्षी एप्रिलमध्ये WHO ने हिरवा कंदील दाखवला होता.

आरोग्य मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला असं उघड केलं होतं की देशातील १०,५०० फार्मास्युटिकल कारखान्यांपैकी ८,५०० MSME श्रेणीत येतात. सगळ्यात आश्‍चर्याची बाब म्हणजे यापैकी फक्त २ हजार कारखान्यांकडे डब्ल्यूएचओचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) प्रमाणपत्र आहे. ६,५०० औषधी कारखान्यांकडे हे प्रमाणपत्र नाही. औषधांच्या दर्जासाठी हा पुरावा असणं अत्यंत आवश्यक आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *