[ad_1]

नवी दिल्ली : आजकल क्या चल रहा है? हमारे यहां तो फॉग चल रहा है। या ओळी तुम्ही ऐकल्या असतीलच. टीव्हीवर आलेली फॉग डिओडोरंटची जाहिरात खूप गाजली.आपण एकमेकांशी बोलताना सुद्धा सहज हे वाक्य वापरतो यावरच या वाक्याची आणि फॉगची मार्केटिंग कल्पना काय कमाल असेल हे आपण ओळखू शकतो. गुजराती व्यापारी दर्शन पटेल यांनी ते बनवताना काही खास रणनीती आखली होती. कोणताही अनुभव नसताना त्यांनी मोठ्या मार्केटिंग कंपन्यांना मागे टाकले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दर्शन पटेल यांनी कुठूनही या व्यवसायात पदवी किंवा शिक्षण घेतलेले नाही.

दर्शन पटेल यांनी फॉग डिओडोरंटला गॅस-फ्री स्प्रे म्हणून प्रोत्साहन दिले होते. आज आम्ही तुम्हाला दर्शन पटेल यांची यशोगाथा सांगणार आहोत. दर्शन पटेल यांनी प्रथम पारस फार्माच्या रूपाने एक उत्तम कंपनी तयार केली आणि नंतर विनी कॉस्मेटिक्सच्या रूपाने प्रत्येक उत्पादन ग्राहकांच्या ओठावर आणले.

कोण आहेत दर्शन पटेल?

दर्शन पटेल हे विनी कॉस्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. हा ब्रँड भारतातील डिओडोरंट उत्पादनांच्या बाजारपेठेत आघाडीवर आहे. तथापि, त्याआधी त्यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय पारस फार्मास्युटिकल्सला भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी बनवण्याचे ध्येय पूर्ण केले. Move, Crack, Ichgard Dermicool आणि D’cold सारखे प्रतिष्ठित औषध ब्रँड तयार करण्याचे श्रेय दर्शन पटेल यांना जाते.

करोना काळात दुग्धव्यवसायाकडे वळला, वर्षाकाठी लाखोंची उलाढाल

अशी झाली सुरुवात

दर्शन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, एकदा मुंबईत ट्रेनमधून उतरताना त्यांना बहुतेक महिलांच्या टाच फाटलेल्या दिसल्या. महिलांच्या भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी काय सुरू करता येईल याचा विचार सुरू केला. यानंतर क्रॅक हील क्रीम लाँच करण्यात आली. बोर्ड रूममध्ये बसून लोकांचे प्रश्न सुटू शकत नाहीत, असे दर्शन पटेल यांचे मत आहे. दर्शन पटेल यांनी क्रॅक हील, मूव्ह आणि इचगार्ड आणि इतर औषधी उत्पादने तयार करणार्‍या पारस फार्मास्युटिकल्सचा व्यवसाय २०१० मध्ये ३२६० कोटी रुपयांना विकला, तर विनी कॉस्मेटिक्सचे मूल्य आता १.२ अब्ज डॉलर्सची पातळी ओलांडून उभे आहे.

असा विकला ‘फॉग’

दर्शन पटेल यांनी २०१० मध्ये फॉग डिओडोरंट लाँच केले. मात्र त्याची विक्री करताना अनेक अडचणी आल्या. पण दर्शन सहजासहजी पराभव स्वीकारायला तयार नव्हता. फॉग डिओडोरंटवर त्यांनी सहा महिने काम केले. यानंतर दर्शन यांनी जाहिरातींमध्ये आपल्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली. हे १६ डिसेंबर २०११ रोजी एका नवीन जाहिरातीसह लॉन्च केले गेले आणि ही जाहिरात हिट झाली. फॉग पुढील दोन वर्षांसाठी भारतातील सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड बनला. दर्शन पटेल यांची मार्केटिंग समज दर्शवते की जर तुम्हाला ग्राउंड रिअॅलिटी माहित असेल तर तुम्ही तुमची कोणतीही उत्पादने सहज विकू शकता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *