मुंबई : महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये झालेली राज्यसभा निवडणूक चुरशीची झाली होती. त्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आणि काही दिवसातच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता पुन्हा एकदा राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील ६ जागांचा यामध्ये समावेश आहे. या जागांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला असता भाजपला ३ जागांवर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एका जागेवर, अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीच्या गटाला एक जागा तर काँग्रेसची एक जागा निवडून येऊ शकते. भाजपच्या कोट्यातून नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन निवृत्त होत आहेत. नारायण राणे यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. इतर दोन नेत्यांना वगळलं जाऊ शकतं, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं भाजप नेत्याच्या हवाल्यानं दिलं आहे.

विनोद तावडेंना बिहार मोहीम फत्ते केल्याचं बक्षीस?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळू शकते तर भाजप प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता भाजपकडून उर्वरित दोन जागांवर एक मराठा आणि एक ओबीसी चेहरा देण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यसभेच्या शर्यतीत विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातं. विनोद तावडे यांनी नुकतीच बिहारची मोहीम फत्ते करुन तिथं पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळं त्यांना केंद्रीय नेतृत्त्वाकडून संधी मिळू शकते. याशिवाय एका ओबीसी नेत्याला देखील संधी मिळेल अशी शक्यता आहे. यातून भाजपचा महाराष्ट्रातील सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न असू शकतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट कुणाला संधी देणार याबाबत अद्याप चर्चा समोर आलेली नाही.
अभियंत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली खंडणी; हेड कॉन्स्टेबलसह चौघांना अटक, काय आहे प्रकरण?
काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी यावेळी कुणाला संधी मिळणार हे देखील पाहावं लागेल. काँग्रेस नेतृत्त्वानं गेल्यावेळी विधानपरिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाकडून चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली जाऊ शकते.
… म्हणून नितीश कुमार पुन्हा भाजपच्या तंबूत! बिहारमधील सत्तांतराची कारणे काय? जाणून घ्या
महाराष्ट्रातून नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाई, कुमार केतकर हे राज्यसभेचे सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
ठाकरे, पवार यांची कसोटी; राज्यातील ६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान, व्हिप ठरणार महत्त्वाचाRead Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *