[ad_1]

मुंबई: अभिनेता विराजस कुलकर्णी सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. सुभेदार या आगामी सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, विराजसनं नुकताच इन्स्टाग्रावर चाहत्यांशी संवाद साधला. इन्स्टाग्रावर त्यानं प्रश्न-उत्तरांच्या सेशनमध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

काही प्रश्न त्याच्या आगामी सिनेमाबद्दल होते तर काही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचेही होते. एका नेटकऱ्यानं विराजसला गौतमीबद्दलही प्रश्न विचारला. ‘माझा होशील ना’ या मालिकेत दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. विराजसची ही पहिली मालिका होती. या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेमही मिळालं. विराजस आणि गौतमी यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. विराजस या मालिकेत आदित्यच्या भूमिकेत होता, तर गौतमीनं सईची भूमिका साकारली होती.

एका नेटकऱ्यानं विराजसला असा प्रश्न विचारला की, गौतमी देशपांडे तुझी सहकलाकार होती तरी देखील तू तिला इन्स्टाग्रामवर फॉलो का करत नाहीस? यावर विराजसनं हटके उत्तर दिलं आहे. ‘कामातून ब्रेक घेण्यासाठी इन्स्टाग्राम आहे. मी इन्स्टाग्रावर फक्त मीम्सचे पेजेस फॉलो करतो, असं विराजस म्हणाला.

शिवानी घरी पण असंच डोकं घाते का?
तसंच आणखी एकानं विचारलं की, ‘ शिवानी घरी पण अधिपती सारखं तुझं डोकं खाते का , शुद्ध मराठी बोलण्यासाठी..?यावर विराजस म्हणाला की, घरी मराठीचा वारसा लाभला आहे. त्यात लेखनही चालू असतं.त्यामुळं मला फार धडे शिकवावे लागत नाहीत.
२४ वर्षांपूर्वीची गोविंदाची एकच चूक आणि उध्वस्त झालं करिअर, सलमान खानने करून घेतला फायदा
दरम्यान, एका मुलाखतीत तू शिवानीसोबत काम केव्हा करणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. ‘तुम्ही दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगा की आम्हाला हा अभिनेता आणि अभिनेत्री एकत्र पाहायचे आहेत. आम्हालाही एकत्र काम करायला आवडेल. पण त्या खास प्रोजेक्टची आम्ही वाट पाहतोय, असं विराजसनं सांगितलं होतं.

विराजस कुलकर्णी -शिवानी रांगोळे अडकले विवाहबंधनात


‘सुभेदार’ सिनेमा

विराजस या सिनेमात ‘जिवा’ ही व्यक्तीरेखा साकारत आहे. छत्रपती शिवरायांच्या हेर खात्यात बहिर्जी नाईक यांच्या हाताखाली काम करणारा हा गु्प्तहेर होता. या भूमिकेसाठी विराजसनं विशेष तयारी केली आहे. त्याच्या लुकचीही चर्चा होताना दिसतेय.

वाट्याला आलं न संपणारं दु:ख; पत्नीला अखेरचा निरोप देताना अभिनेत्याला आवरला नाही हुंदका

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *