[ad_1]

सातारा: परिस्थितीवर मात करून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन दुष्काळग्रस्त भागातील प्रगतशील शेतकरी होतो. सोळशी गाव हे कोरेगाव तालुक्यातील भागात वसलेले गाव आहे. हा भाग प्रामुख्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पिण्यासाठी पाणी नाही तर शेती कशी करणार म्हणून शेतकरी हैराण झाले आहेत. पण यावर मात करून जिद्द, चिकाटी असली तर अशक्य ही शक्य करू शकतो हे जालिंदर सोळसकर या युवा शेतकऱ्याने ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊन करून दाखवले आहे.
ना कोणतं मार्गदर्शन ना आर्थिक सहाय्य; सेंद्रिय पद्धतीने भाजी पिकवण्याचा निर्धार, पडीक जमिनीवर शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
जालिंदर सोळसकर यांनी डीप इरिकेशन करून, पेपर मिलिशन, स्टेजिंग करून कमी पाण्यामध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. ढोबळी मिरचीची लागवड करून ५ महिने झाले. या ५ महिन्यांमध्ये १३ वेळा तोडणी झाली आहे. जवळपास एका तोडणीमध्ये चक्क १३ टन ढोबळी मिरचीच्या मालाची तोडणी दुष्काळी भागातील शेतकऱ्याने केली आहे. आजपर्यंत १५० टन मालाची तोडणी करून ती विक्री देखील जालिंदर सोळसकर यांनी केली आहे. ढोबळी मिरचीचा प्लॉट हा प्रामुख्याने दोन ते तीन महिने चालतो. मात्र, या पट्ट्याने ८ महिने चालवणार असल्याचे सांगितले आहे.

या ढोबळी मिरचीची लागवड करताना न्यूट्रिशनचे काम, फटीला पेस्ट आणि डीसीचे काम, वाईट फ्लाय ट्रिप्स त्याचबरोबर वायरस होऊ नये याची काळजी घेत सेकिंग, भुरी, यांसारखे कोणतेही हानी न होता वेळोवेळी केलेली औषध फवारणी. उन्हाळ्यामध्ये त्याचबरोबर थंडीमध्ये पिकाला कोणती इजा होऊ नये, याची काळजी घेत यासाठी ऍग्रो सेल्फ, ॲग्रो मॅजिक या केमिकलचा वापर केला. त्या जोडीला हरबल केमिकलचा वापरदेखील कमी प्रमाणात केला गेला आहे. त्यामुळे दोन एकरमध्ये १५० टनाहून अधिकचा मालचे आतापर्यंत त्यांना उत्पादन करता आला आहे.

Chapati Business : उच्च शिक्षण, पण कोरोनात नोकरी गेली; डोक्यातली संकल्पना सत्यात उतरवत तरुणाची कमाल

दोन एकरामध्ये घेतलेल्या ढोबळी मिरचीचा दर हा ६० रुपये तर कधी ७० रुपये किलो असा होता आणि आजचा भाव धरला तर ४० ते ४५ रुपये किलो एवढा आहे. या सर्वाची सरासरी पकडून दर ५० रुपये एवढा धरला, तर ७५ लाख रुपये एवढे उत्पादन २ एकरामध्ये ढोबळी मिरचीमधून मिळाले आहे. या मिरचीच्या लागवडीचा खर्च १० लाख रुपये झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ६५ लाख रुपये एवढा निव्वळ नफा या मिरचीच्या लागवडीमुळे मिळाल्याचे जालिंदर सोळसकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी जर कामाचे नियोजन, पिकाचे नियोजन आणि दराचे नियोजनाचा अभ्यास करून शेती केली आणि त्याचबरोबर भागातील सर्व शेतकरी एकत्र येऊन शेती केली तर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा या शेतीतून होऊ शकतो, असा देखील कानमंत्र सोळसकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *