मुंबई : रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकिकडे रोहित शर्मा काहीही बोलत नसला तरी त्याची पत्नी रितिका सजदेह मात्र मुंबई इंडियन्सला धारेवर धरत एकामागून एक पोस्ट करत आहे. सध्याच्या घडीला रितिकाच्या एका पोस्टने क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. रितिकाच्या या पोस्टवरून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ कधी सोडणार, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

मंगळवारी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी संघाच्या कर्णधारपदावरून भाष्य केले होते. खरंतर त्यावेळी त्यांना भाष्य करण्याची कोणतीही गरज नव्हती. पण रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून का काढलं, हे त्यांनी पुन्हा एकदा सर्वांपुढे मांडलं. पण त्यानंतर रोहितची पत्नी रितिकाने एका वाक्यात बाऊचर यांना चोख उत्तर दिले होते. रोहितने आतापर्यंत बरंच काही सहन केलं आहे, असं रितिकाला सांगायचं होतं. त्यानंतर बाऊचर आणि मुंबई इंडियन्स यांना ट्रोल केले गेले. त्यानंतर रितिकाने आता गुरुवारी पुन्हा एक पोस्ट केली आहे आणि त्यावरुन आता रोहित शर्मा कधी मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. रितिकाने इंस्टाग्रामवर ही पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये रितिकाने डॉयनासोरचे चित्र लावले होते आणि त्याखाली तिने सोप्या शब्दांत एक इंग्रजी ओळ लिहिली होती. रितिकाने या पोस्टमध्ये लिहिले होते की, ” ज्युरासिक वर्ल्डचा नवा चित्रपट हा २०२५ साली रिलीज होणार आहे.” खरं तर रिकिताला या सिनेमाबाबत लोकांना सांगयची काहीच गरज नव्हती. पण या तिच्या वाक्यातील वर्ष सर्वात महत्वाचे समजले जात आहे आणि त्याचा संबंध रोहित शर्माशी जोडला जात आहे. रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद गेले असले तरी तो या वर्षी काही संघाची साथ सोडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. कारण रोहित शर्मा कुठल्याही दुसऱ्या संघात गेलेला नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही संघाने त्याला ऑफर दिलेली नाही. पण आता पुढच्या वर्षी मात्र आयपीएलची ट्रान्सफर विंडो उघडणार आहे. त्यावेळी कोणताही संघ रोहित शर्मा संघात घेऊ शकतो. त्यामुळे रोहित शर्मा हा २०२५ साली मुंबई इंडियन्सची साथ सोडून जाऊ शकतो, असे या पोस्टनंतर म्हटले जात आहे.

रोहित शर्मा एअरपोर्टवर स्पॉट

रितिकाच्या या पोस्टचा अर्थ नेमका काय आहे, हे आतापर्यंत बऱ्याच जणांना समजला नाही. पण २०२५ वर्ष लिहिण्यामागे रोहित शर्माबाबतची एक हिंट रितिकाने दिल्याचे आता म्हटले जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *