[ad_1]

ब्राझिलिया: अनेकदा मौजमस्ती तसेच लोकांच्या मूर्खपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. नुकतीच आणखी अशी एक घटना घडली आहे. २९ जुलै रोजी ४२ वर्षीय संशोधक गॅरोन माईया आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस्को माईया यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या विमानाचे ट्विन इंजिन बीचक्राफ्ट बॅरन ५८ जंगलात कोसळून झालेल्या अपघातात या बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

अपघातापूर्वी समोर आलेला व्हिडिओ अतिशय भयानक आहे. हा अपघात कसा घडला असेल याचा अंदाज या व्हिडिओवरुन येतो. यामध्ये गॅरोन उडत्या विमानात दारू पीत असून त्याने विमानाचा ताबा आपल्या ११ वर्षांच्या मुलाच्या हातात दिलेला दिसत आहे. Express.co.uk च्या मते, अपघातात पिता-पुत्राच्या दुःखद मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता.

दररोज वेगवेगळ्या नंबरवरुन फोन, अश्लील मेसेज; अल्पवयीन मुलीचा कंटाळून धक्कादायक निर्णय
या घटनेचा तपास सुरू असून, हा व्हिडिओ अपघातापूर्वी शूट करण्यात आला होता का, हे तपासण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. व्हिडिओमध्ये गॅरोन बिअर पीत असताना आपल्या मुलाला विमान चालवण्याची सूचना देताना आणि त्याला विमानातील नियंत्रणाबाबत शिकवताना दिसत आहे.

गॅरोनने व्हिडिओ केव्हा घेतला हे स्पष्ट झाले नसले तरी, तपासकर्त्यांनी सांगितले की त्यात जे काही दिसले त्यावरून तो स्वतःच्या आणि त्याच्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल पूर्णपणे बेफिकीर होता. विमान क्रॅश झाले तेव्हा लहान मुलगा उड्डाण करत होता का, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न तपासकर्ते करत आहेत.

स्थानिक ब्राझिलियन आउटलेटच्या अहवालानुसार, गॅरोन नोव्हा कॉन्क्विस्टा येथील रॉन्डोनिया शहरातील एका कौटुंबिक शेतातून त्यांनी उड्डाण घेतलं आणि नंतर विल्हेना येथील विमानतळावर इंधन भरण्यासाठी थांबले. त्यांचा मुलगा कॅम्पो ग्रांडे, माटो ग्रोसो डो सुल येथे परत करण्याचा त्यांचा हेतू होता, जिथे तो त्याच्या आईसोबत राहत होता आणि शाळेत जात होता.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन झाले नाही, महिलेचीही आत्महत्या

दरम्यान, या भीषण घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला. दोघांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासांनी गॅरोनची पत्नी अॅना प्रिडोनिकने १ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. ब्राझीलच्या कायद्यानुसार, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांनी हायस्कूल पूर्ण केले आहे आणि राष्ट्रीय नागरी उड्डयन एजन्सीमध्ये नोंदणीकृत आहे त्यांनाच विमान उडवण्याची परवानगी आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *