[ad_1]

नवी दिल्ली : मणिपूरवरून संसदेत आक्रमक भाषण करून तसेच मोदी सरकारवर टीकेची झोड उठवून आपलं भाषण संपवून निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा अतिशय गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. असं कृत्य केवळ महिलाद्वेषी मनुष्यच करू शकतो. संसदेत असं कृत्य करणं अशोभणीय आहे, राहुल गांधी यांच्या या कृत्याविरोधात आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत, असा आक्रमक पवित्रा स्मृती इराणी यांनी घेतला.

विरोधी आघाडीने मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. अविश्वास प्रस्तावाच्या पहिल्या दिवशी भाषण न केलेल्या राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशी जोरदार भाषण ठोकून भाजपला धारेवर धरलं. भारतमाता ही माझी आई आहे. मणिपूर हा भारताचं अविभाज्य अंग आहे. या सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केलेत. म्हणजे या सरकारने माझ्या आईचीच हत्या केलीये, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. नरेंद्र मोदी केवळ अमित शाह आणि गौतम अदानी या दोन माणसांचंच ऐकतात, बाकीच्यांचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. मणिपूर जळत असताना मोदी आणखी तिकडे का गेले नाहीत? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. सुमारे अर्ध्या तासाचं आक्रमक भाषण संपवून राहुल गांधी संसदेतून निघाले.

नेमकं काय घडलं?

राजस्थान दौऱ्यावर दुपारी दीड वाजता रवाना व्हायचं असल्याने आपलं भाषण संपवून राहुल गांधी संसदेतून निघाले असताना त्यांनी सभागृहातच फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांचं कृत्य अशोभणीय आहे. राहुल गांधी यांच्या कृत्याने संसदेची गरिमा राहिलेली नाही. याआधी असं कृत्य कोणत्याही खासदाराने केलेलं नाहीये. त्यांच्याविरोधात भाजपच्या सर्व महिला खासदार आम्ही अध्यक्षांकडे दाद मागू, त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी आमची मागणी असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं.

ज्यांना आज माझ्या आधी भाषण करण्याची परवानगी दिली, ते आज संसदेत फ्लाइंग किस देऊन निघून गेले. महिलांशी असलेलं विरोधी वर्तन देशाच्या सभागृहात कधीच पाहायला मिळालेलं नाही. हे कोणत्या खानदानाचे लक्षण आहे, हे साऱ्या देशाने आज पाहिले, अशी जळजळीत टीका स्मृती इराणी यांनी केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *