[ad_1]

कोल्हापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी त्यांनी देवी चरणी “कुणालाही काहीही कमी पडू देऊ नकोस, तसेच कोणाला उपाशी झोपू देऊ नको, कोणाला दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ देऊ नको, आपल्या दारात आलेल्या माणसाला रिकाम्या हाती जाऊ देऊ नको” अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं आहे.

“माझ्या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांना आमच्याशी बोलायचं आहे. हे कार्यकर्ते तर २०१४ पासून मी मुख्यमंत्री व्हावं, असं म्हणत आहेत, या गोष्टी काही नवीन नाहीत” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. कोल्हापुरात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

गिरीश महाजनांनी अण्णा हजारेंचं आंदोलन गुंडाळलं, पण मनोज जरांगे गुंडाळण्यासारखी व्यक्ती नव्हे: संजय राऊत
पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली असून सकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्या सकाळी एका खाजगी हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यानंतर हॉटेल ते अंबाबाई मंदिरापर्यंत खासदार धैर्यशील माने यांनी पंकजा मुंडे यांच्या गाडीचे साराथ्य केले.

शिंदेंना खुर्ची द्यायला नको, म्हणून ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपदच नाकारलं, कीर्तिकरांचा आरोप
पंकजा मुंडे यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद साधला. “मी सध्या शिव शक्ती परिक्रमा यात्रा करत असून ज्योतिर्लिंग आणि साडेतीन शक्तीपीठे यांसह पंढरपूर अक्कलकोट या सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहे. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे. अनेक कार्यकर्त्यांना माझ्याशी संवाद साधायचा आहे हे दिसून येत आहे. ज्या गोष्टी बैठकांमध्ये आणि सर्वांमध्ये बोलता येत नाहीत, अशा गोष्टी कार्यकर्ते माझ्याशी बोलत आहेत” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून मी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत, मात्र हे काही नवीन नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या.

तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, विजयभाऊंची काय गॅरंटी? बच्चू कडूंचा वडेट्टीवारांना टोला
दरम्यान “काँग्रेसकडून देखील सध्या जनसंवाद यात्रा सुरू असून त्यांची जनसंवाद यात्रा आणि माझी यात्रा ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्या यात्रेत उपस्थित केलेले प्रश्न हे त्यांचे आहेत, मी माझ्या स्थानी योग्य आहे, असे म्हणताना ऊसतोड कामगारांबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे. ऊसतोड कामगारांचा करार संपला आहे. यामुळे ते संपाच्या भूमिकेत आहेत. सरकारची परिस्थिती पाहता कारखानदारांनी योग्य भूमिका घ्यावी” असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

माझ्यापेक्षा पंकजाताईंचं मनगट बळकट, म्हणून तलवार दिली ; उदयनराजेंची फटकेबाजी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *