पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती शहरातील सिनेमा रोड येथील एका प्रसिद्ध लॉजमध्ये महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. रेखा विनोद भोसले (वय ३६, रा.सोनवडी ता.दौंड जि. पुणे) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेचे वडील महादेव धोंडीबा सोनवणे (वय ५८, रा.सोनवडी ता.दौंड जि.पुणे) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील सिनेमा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये एका महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस सदर ठिकाणी पोहोचले व तपासाची चक्रे सुरू केली.

बारामतीत लॉजमधील खोलीत महिलेचा खून, धक्कादायक कारण समोर
पोलिसांच्या तपासात सदर महिलेचा खुन तिचा पती विनोद गणेश भोसले (रा.वी विंग रूम नं.२ म्हाळसाई कृपा आप्पा शास्त्री नगर कोपर रस्ता डोंववली) याने केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खुन केल्याचे पोलीसांचे तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरा दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती विरोधात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध चालू असून तपासकामी वेगवेगळी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

सदर गुन्हयाचा तपास पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, संजय जाधव अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेके व इतर अधिकारी,अमंलदार तपास करीत आहेत.

आधी म्हणाले, नाभिकांनो, मराठा समाजाच्या हजामती करू नका, आता म्हणाले, त्या गावापुरतेच….Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *