[ad_1]

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं १३ वेळा लाँचिंग झालं आणि ते अयशस्वी ठरलं अशी टीका अमित शाह यांनी केली. यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी ज्या महिलेच्या घरी गेले होते त्या कलावतीचं काय झालं असा सवाल केला. कलावतीला मोदी सरकारनं सर्वकाही दिलं असा दावा केला. अमित शाह यांनी कलावती बुंदेलखंड असल्याचा उल्लेख केला. मात्र, कलावती बांदुरकर या महिलेच्या घरी राहुल गांधी गेले होती. ती महिला बुंदेलखंडमधील नसून महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.

अमित शाह यांनी कलावती यांची गोष्ट सांगत राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोलकेला. अमित शाह म्हणाले, ‘एक गरीब महिला कलावतीच्या घरी तो नेता जेवण करण्यासाठी गेला होता, इथं मागं बसून गरिबीचं वर्णन केलं होतं. त्यानंतर त्यांच सरकार ६ वर्ष होतं, मला त्यांना विचारायचं आहे त्या कलावतीचं काय झालं?’ असं अमित शाह म्हणाले. कलावतीला घर, वीज, गॅस, शौचालय, धान्य, आरोग्य देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं, असं अमित शाह म्हणाले.

कलावती बांदूरकर कोण आहेत?

कलावती बांदूरकर या यवतमाळ जिल्ह्यातील जालका गावातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण होतं. राहुल गांधी यांनी २००८ मध्ये कलावती यांची भेट घेतली होती. कर्ज फेडता न आल्यानं कलावती यांचे पती परशूराम बांदूरकर यांनी आत्महत्या केली होती. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांना देशभरातून मदत मिळाली होती.

भाजपची महिला पदाधिकारी नागपूरहून मध्य प्रदेशला गेली, जबलपूरमध्ये घडलं भयंकर, पोलीस तपासात गूढ उलगडलं
राहुल गांधी यांनी मदत केल्याचं कलावती बांदूरकर यांनी गेल्या वर्षी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. राहुल गांधी भेटायला आले आणि त्यांनी गरिबी दूर केली, असं त्यांनी म्हटलं होतं. कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधींनी तीन लाख रुपयांचा चेक दिल्याचं म्हटलं. आणि नंतरच्या काळात ३० लाख रुपये वर्ग केल्याचं म्हटलं.

कलावती बांदूरकर यांचे पती परशूराम बांदूरकर यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्यावर कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी होती. आता कलावती यांच्याकडे चांगलं घर, वीज आणि पाण्याचं कनेक्शन असून काम केलं पाहिजे या भावनेतून शेतमजूर म्हणून काम करतात.
मुकेश अंबानींनी त्यांचे सुपर लक्झरी घर विकले?, कितीला विकली ही मालमत्ता जाणून घ्या

काँग्रेसचं ट्विट

१४ वर्षानंतर राहुल गांधी यांची भेट

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी वाशिम जिल्ह्यातून गेली होती. त्या यात्रेत काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी कलावती बांदूरकर आणि राहुल गांधी यांची भेट घडवून आणली. कलावती बांदूरकर यांच्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला तर दुसरा मुलगा पोलीस भरतीची तयारी करत आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ११ ऑक्टोबर २०११ मध्ये बुंदेलखंडमध्ये एका मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीच्या घरी मुक्काम केला होता.त्या व्यक्तीचं नाव कुंजी लाल कोरी होतं.

राहुल गांधींवर फ्लाईंग किसचा आरोप, लोकसभेच्या एक्झिट दाराजवळ काय घडलं? वाचा आँखो देखी….[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *