[ad_1]

मुंबई: ‘आई कुठे काय करते’च्या आजच्या एपिसोडमध्ये देशमुखांच्या घरी सर्वजण मोठ्या भक्तीभावाने सत्यनारायणाच्या पूजेत सहभागी होतात. विशाखा जबरदस्तीने ईशाला आरतीसाठी घेऊन येते आणि त्यानंतर पूजा संपन्न होते. अरुंधतीचा भाऊ ईशा आणि अनिशला आशीर्वाद देत त्यांना लग्नाची भेटही देतो. तेवढ्यात गुरुजी जाहीर करतात की ४ दिवसांनी ईशा-अनिशच्या लग्नाची तारीख काढण्यात आली आहे. अरुंधती सत्यनारायणाकडे ईशा-अनिशला एकमेकांच्या साथीने लढण्याचं बळ मिळू दे म्हणत प्रार्थना करते.

यानंतर ईशाच्या बालपणीच्या आठवणीत सर्वजण रमतात. तिला लहानपणी दुखलं-खूपलं की बाबांचा हात डोक्यावर फिरल्याशिवाय तिला बरं वाटायचं नाही असं तिचा मामा म्हणतो. अनिरुद्ध आणि ईशाच्या बाँडिंगविषयी सर्वजण बोलत असतात. अरुंधती जेव्हा ईशाच्या हट्टीपणाविषयी बोलते तेव्हा ईशा तिला ऐकवते की आता तुझ्याकडे माझ्याविषयी चांगलं बोलण्यासाठी काही शिल्लकच राहिलं नाहीये का? असं म्हणून ती वैतागून निघून जात असते तेव्हा कांचन आजी सांगते की तिने आता इथेच थांबायचं आहे, इथूनच तिची पाठवणी होईल. तेव्हा ईशाच्या रागाचा पारा आणखी वाढतो कारण तिच्या लग्नासाठी कोणी साधा हॉलही बूक केलेला नसतो. ईशा नाराजीच्या स्वरातच विचारते की मी राहीन, पण बाबांना चालणार आहे का हे?

‘ठरलं तर मग’मध्ये काय चाललंय? मीरा जगन्नाथनंतर या कलाकाराची एक्झिट; लोकप्रिय खलनायकाची एन्ट्री
यावर अनिरुद्ध वैतागून म्हणतो की तसंही या घरात माझं कोणी ऐकत नाही, तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला आणि माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. तो ईशाचं कन्यादान करायलाही नकार देतो. अरुंधती आणि आशुतोषला करुदे ईशाचं कन्यादान, असं म्हणून तो निघून जातो.

त्यांनंतर विशाखाला गुपचूप रडताना पाहून अरुंधतील नेमकं कळत नाही की तिच्या आयुष्यात काय झालं आहे का? तेव्हा विशाखा उडवाउडवीची उत्तरं देत सांगते की दादा (अनिरुद्ध) ईशाशी असं वागला या गोष्टीचा ती विचार करते आहे. ईशावर जीव असूनही तो असं का वागतोय याचा अर्थच तिला लागत नसतो. अरुंधती म्हणते की, बऱ्याच पुरुषांना आपला हळवेपणा समोरच्यांना दाखवणं म्हणजे आपली हार वाटते. समोरच्याला माफ करणं म्हणजे स्वत:चा कमीपणा वाटतो. म्हणून स्वत:भोवती कठोरपणाचं कवच तयार करतात, असंच अनिरुद्धंचं झालं आहे. तेव्हा विशाखा म्हणते की सगळ्या पुरुषांना आपल्या माणसांपेक्षा स्वत:चा अहंकार का मोठा वाटतो?

ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्रीचा मुलगा रमला हॉटेल व्यवसायात; ठाण्यात सुरू केलं पावभाजी सेंटर
अरुंधतीला नेमकं कळत नाही ‘सगळ्या पुरुषांबद्दल’ म्हणजे विशाखा नेमकं कोणाबद्दल बोलते आहे. ते पुन्हा एकदा विशाखाला विचारते की सगळं ठीक आहे ना? अप्पाही विशाखाला असंच विचारतात, मात्र ती त्यांच्याशीही नीट बोलत नाही. तिच्या बोलण्याचा-वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अरुंधती करत असते. एपिसोडच्या शेवटी ईशा आणि अनिश यांच्यामध्ये एखाद्या नवरा बायकोप्रमाणे संभाषण पाहायला मिळतं.

काय होणार पुढील भागात?

पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, केदार काका लग्नात यायलाच हवा असा हट्ट ईशा-यशने विशाखाकडे केल्यानंतर न राहवून विशाखा मोठ्याने ओरडते की केदार येणार नाही म्हणजे नाही. त्यानंतर ती अरुंधतीला सांगते की, केदारने तिच्याकडे घटस्फोट मागितला आहे. त्यांचं हे बोलणं अप्पा ऐकतात आणि तेदेखील पुरते हादरुन जातात.

कुस्तीमधून उलगडणार प्रेमाची गोष्ट, तुझं माझं सपान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *