[ad_1]

मुंबई- २००९ चा फिल्मफेअर अवॉर्ड शो आठवतो? त्या शोची एक व्हिडिओ क्लिप अनेकदा व्हायरल होत असते, ज्यामध्ये शाहरुख खान नील नितीन मुकेशच्या नावाची खिल्ली उडवताना दिसत होता. हे पाहून नील शाहरुखला ओरडला होता. आणि त्याचा अपमान केला. पण ते खरंच घडलेलं का? नील नितीन मुकेशने आता यावर प्रतिक्रिया दिली असून, सत्य काय घडले होते ते सांगितले आहे.

सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संभाषणात नील नितीन मुकेशला २००९ च्या त्या व्हायरल व्हिडिओबद्दल विचारण्यात आले आणि अभिनेत्याने सांगितले की, त्याने आणि शाहरुख खानने कधीही एकमेकांचा अपमान केला नाही. उलट दोघंही एकमेकांची मस्करी करत होते आणि त्यांना हे आधीच माहीत होतं.

रणदिप हुड्डाच्या या गोष्टींना वैतागून महेश मांजरेकरांनी सोडला वीर सावरकर, समोर आले मोठे कारण
शाहरुखने उडवली खिल्ली, नील नितीन मुकेशला म्हणाला ही गोष्ट

खरं तर, 2009 चा फिल्मफेअर पुरस्कार सैफ अली खानसह शाहरुखने सूत्रसंचालित केला होता. शाहरुखने नीलला तुला तीन नावे पण आडनाव का नाही, असा प्रश्न विचारला होता. शाहरुखचा प्रश्न होता, ‘माझा नील नितीन मुकेशला प्रश्न आहे की तुझे नाव नील नितीन मुकेश आहे, पण भाऊ तुझे आडनाव कुठे आहे? प्रत्येकाचे पहिले नाव आहे. यावर प्रेक्षकांमध्ये बसलेला अभिनेता म्हणाला, ‘मला वाटतं हा माझा अपमान आहे. हे योग्य नाही. मला वाटते की माझे वडीलही इथे बसले आहेत हे तुम्ही पाहिले नाही का. मला वाटते तुम्ही लोकांनी गप्प बसायला हवे. मला माफ करा.’

पठाणचा राग अनावर; एअरपोर्टवर गर्दी, सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला शाहरूखने ढकललं

नील नितीन मुकेशने सांगितले सत्य

जेव्हा नील नितीन मुकेशला विचारण्यात आले की संपूर्ण घटना स्क्रिप्टेड होती का? तर अभिनेता म्हणाला, ‘तुम्ही असं म्हटलं तर मी त्यावर विश्वास ठेवेन. याला स्क्रिप्टेड म्हणायचे असेल तर ठीक आहे, पण त्यात प्रेम होते. त्यांनी मला आधीच सांगितले होते की ‘मी तुझ्यासोबत काही विनोद करेन.’ म्हणून मी विचारले, ‘सर, आपण कोणत्या स्तरावरील गंमत बोलताय?’ ते म्हणाले, तुला यावर जी प्रतिक्रिया द्यायची ती दे. त्यांनी मला ते स्वातंत्र्य दिले, म्हणून मी ते केले. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा मी कधीही अनादर करणार नाही. मुकेशचे कुटुंबीय कधीही कोणाचा अपमान करणार नाहीत.

‘खोट्या दाव्यांवर जिंकलाय’,TMKOC चे निर्माते असित यांची शैलेश लोढांच्या विजयावर प्रतिक्रिया
नील नितीन मुकेश २०१९ पासून चित्रपटांपासून दूर आहेत

नील नितीन मुकेशने सांगितले की, तो शाहरुख खानवर खूप प्रेम करतो. करिअर आणि स्टारडमच्या बाबतीत तो कुठेही असला तरी तो कधीही कोणाचा अपमान करू शकत नाही. करिअरबद्दल बोलायचे झाले तर नील नितीन मुकेश २०१९ पासून चित्रपटांपासून दूर आहे. तो शेवटचा प्रभास स्टारर ‘साहो’ मध्ये दिसला होता, पण तो फारसा चालला नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *