नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चव्हाणांनी भेट घेतल्याने राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले होते.

राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याची प्रक्रिया समजून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदारकी आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अशोक चव्हाण देण्याची चर्चा सुरु झाली. चव्हाण हे नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद देण्यास भाजप नेत्यांचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीचं तिकीट देत अशोक चव्हाण यांना खासदारकी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे.
श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूरच्या रणांगणात, तीन निकषांवरुन पक्षही ठरला, राजकीय हालचालींना वेग

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

अशोक चव्हाण हे ८ डिसेंबर २००८ ते ११ नोव्हेंबर २०१० अशा जवळपास दोन वर्षांच्या काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००८ साली मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण मुख्यमंत्री झाले होते. सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे. अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत.
VIDEO | तुझ्या बापाने मी कॉन्ट्रॅक्टरसोबत फिरतो ते पाहिलं का? शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर अजित पवार कडाडले
२००९ साली विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती.

सबको सन्मती दे भगवान; नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या बॅनरची चर्चा, पक्षचिन्ह गायब

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

२०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *