[ad_1]

नवी दिल्ली : लोकेश राहुलसारखा अनुभवी खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आणि चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता राहुलच्या जागी भारतीय संघात युवा तडफदार खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहित शर्माची चिंता मिटणार आहे.

लोकेश राहुल हा पहिल्या कसोटीत खेळत असताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. पण त्यानंतर तीन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात राहुलची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता राहुल तिसऱ्या कसोटीत संघात येईल आणि फलंदाजी अधिक बळकट होईल, असे वाटले होते. पण राहुल अजूनही फिट झालेला नाही. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण राहुलच्या जागी भारतीय संघात युवा तडफदार खेळाडूची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अजून एक युवा खेळाडू भारतीय संघात दाखल झाला आहे. आयपीएलबरोबर स्थानिक क्रिकेट गाजवत कर्नाटकच्या देवदत्त पडीक्कलने आपले स्थान निर्माण केले आहे. आता त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. देवदत्त सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. २३ वर्षीय देवदत्तने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सहा डावांत ५५६ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत १९३ धावांची दमदार खेळी त्याने साकारली होती. त्याचबरोबर भारतीय अ संघाकडून खेळत असताना त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे देवदत्त सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे आणि त्यामध्येच त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे देवदत्तच्या फॉर्मचा आता भारतीय संघाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता या तिसऱ्या कसोटी सामन्यात देवदत्तला भारतीय संघात संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

काव्या मारन चेन्नईला भिडली, भारताला नडला त्याला कोट्यधीश केलं, ट्रेविस हेडवर पाण्यासारखा पैसा ओतला

भारताचा तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात देवदत्तला पदार्पण करण्याची संधी मिळणार का, याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना नक्कीच असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *