[ad_1]

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मोदींच्या नेतृत्त्वात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार की इंडिया आघाडी सत्ताधाऱ्यांचा विजयरथ रोखणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा कौल कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. इंडिया टुडे समूहानं याबद्दल केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. गेल्या निवडणुकीत यातील ६२ जागांवर भाजप प्रणित एनडीएनं विजय मिळवला होता. यावेळी भाजपला ७० जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना ४९.९७ टक्के मतं मिळाली होती. यावेळी त्यांना ५२.१ टक्के मतं मिळू शकतात. एनडीएला मागील निवडणुकीच्या तुलनेत ८ जागा अधिक मिळण्याची शक्यता आहे.
भाजप नको, पण सत्ता हवी; काँग्रेस नेत्यांनी शोधला नवा पॅटर्न; सिद्दीकींनंतर कोणाचे नंबर?
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचं मतदान ३५ टक्क्यांच्या खाली येण्याचा अंदाज आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा फटका बहुजन समाज पक्षाला बसू शकतो. बसपला काँग्रेसपेक्षा अधिक मतं मिळतील असा अंदाज आहे. पण त्यांना एकही जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांना मिळणारं मतदानही कमी होऊ शकतं.

भाजप आणि मित्र पक्षांना यावेळी उत्तर प्रदेशात ५२.१ टक्के मतदान होऊ शकतं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढण्याचा अंदाज आहे. २०१४ मध्ये भाजपप्रणित एनडीएनं उत्तर प्रदेशात ७१ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये हाच आकडा ६२ वर आला. आता भाजपला ७० आणि मित्रपक्षांना २ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यावेळी काँग्रसला ५.५ टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसचं मतदान ०.८६ टक्क्यानं घटू शकतं. २०१९ मध्ये काँग्रेसला ६.३६ टक्के मतदान झालं होतं. त्यांना केवळ एक जागा मिळाली होती. सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी झाल्या होत्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला १८.११ टक्के मतं मिळाली होती. यावेळी त्यांना ३०.१० टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. समाजवादी पक्षाला यावेळी बहुजन समाज पक्षाची मतं मिळताना दिसत आहेत. स्वबळावर लढू पाहणाऱ्या बसपला यावेळी ८.४ टक्के मतं मिळू शकतात. गेल्यावेळी त्यांना १९.०४ टक्के मतं मिळाली होती. स्वबळावर लढण्याचा मोठा फटका बसपला बसू शकतो.

यंदा भाजपला ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचा मित्रपक्ष अपना दलाला २ जागा मिळू शकतात. म्हणजेच एनडीएला उत्तर प्रदेशात ८० पैकी ७२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पक्षाला ७, काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. सपला दोन जागांचा फायदा होऊल शकतो. तर काँग्रेस एक जागा कायम राखेल. बसपला सर्वात मोठा फटका बसेल. त्यांना भोपळाही फोडता येणार नाही, असं सर्व्हे सांगतो.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *