[ad_1]

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षानं छोट्या पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडला सोबत घेत भाजपनं विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का दिला. यामुळे बिहारमध्ये भाजपची सत्ता आली. यानंतर आता भाजपनं उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे.भाजपनं लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. यावरुन रायगडमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलं. ४०० पार कशी जाते तेच बघतो, असं ठाकरे म्हणाले. यानंतर आठवड्याभरात मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यात युतीबद्दल चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जास्तीत जास्त पक्षांना आपल्या सोबत घेण्याची भाजपची योजना आहे.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं २०१९ मध्ये भाजपची साथ सोडली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. पण २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदार भाजपसोबत गेले. त्यामुळे राज्यात भाजप सरकार आलं. शिवसेनेनंतर भाजपचा दुसरा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या २०२० मध्ये भाजपची साथ सोडली. कृषी विधेयकांवरुन अकाली दलानं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.शिवसेना आणि भाजपची युती १९८९ मध्ये झाली. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप १९९६ मध्ये सोबत आले. तब्बल २४ वर्षे या पक्षांची युती होती. २०२० मध्ये वेगळे झालेले पक्ष आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीआधी दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला पंजाबमध्ये फायदा होऊ शकतो.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाली दल आणि भाजपमधील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. २०१७ आणि २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अकाली दलाचा धुव्वा उडाला आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अकाली दलासाठी महत्त्वाची आहे. भाजपनंदेखील ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पक्षांची साथ महत्त्वाची ठरणार आहे. अकाली दल आणि भाजप २४ वर्षे एकमेकांचे साथीदार होते. २०२० मध्ये त्यांची युती तुटली. त्याआधी त्यांनी प्रत्येकी ५ वेळा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक युती म्हणून लढवली. राज्यात तीनदा त्यांचं सरकार आलं. लोकसभा निवडणुकीचा विचार करता राज्यात अकाली दल भाजपसाठी मोठा भाऊ ठरला. अकाली दल १०, तर भाजप ३ जागा लढवत आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *