[ad_1]

मुंबई : अब्जाधीशांच्या यादीत अनेकांना सामील होताना आपण पाहिले असेल, पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची संपत्ती १७,५४५ कोटी रुपयांवरून शून्यावर आली आहे. होय… गेल्या काही महिन्यांपासून संकटात सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूजचे संस्थापक बायजू रवींद्रनचा वर्षभरापूर्वीपर्यंत श्रीमंतांच्या यादीत समावेश होता.बायजूजच्या अडचणीत वाढ
यशाच्या शिखरावरून तोंडाशी आपटण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एडटेक कंपनी बायजू. दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बायजूच्या अडचणी कमी होण्याची चिन्हेच दिसत नाही. एकीकडे आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे पगार ठाकले आहेत तर बायजूला आणखी एक धक्का बसला आहे. फोर्ब्सच्या नव्या अब्जाधीशांच्या यादीत बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांची एकूण संपत्ती शून्य झाली आहे. रवींद्रन वर्षभरापूर्वी देशातील सर्वात तरुण अब्जाधीश होते.
‘रेणुका’शक्ती! पतीने टॅक्सी चालवली, खेळणी विकली, पत्नी आज गडगंज श्रीमंत; संपत्ती मोजताना थकाल
वर्षभरापूर्वी कोट्यवधींची संपत्ती होती
बायजूवर सुरू असलेले संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि दुसरीकडे, कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. वर्षभरापूर्वी देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी असलेले बायजूचे सीईओ रवींद्रन यांची एकूण संपत्ती वर्षभरापूर्वी २.१ अब्ज डॉलर किंवा सुमारे १७,५४५ कोटी रुपये होती, परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांक २०२४ मध्ये रवींद्रन यांची एकूण संपत्ती शून्य असल्याचे दिसत आहे.

बायजूजचे मूल्य किती?
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये सध्या सुरू असलेल्या कॅशच्या तुटवड्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून एकेकाळी यशाची कहाणी लिहिलेल्या एडटेक फर्मसाठी ही मोठी घसरण आहे. अब्जाधीशांच्या यादीतून बायजू रवींद्रनच्या वगळल्याबद्दल फोर्ब्सने सांगितले की, या वेळी केवळ चार लोकांनाच लिस्टमधून वगळण्यात आले आहे ज्यात माजी एडटेक स्टार बायजू रवींद्रन यांचा समावेश आहे. तसेच ब्लॅकरॉकने कंपनीचे मूल्यांकन मागील वर्षीच्या २२ अब्ज डॉलरवरून फक्त १ अब्ज डॉलरपर्यंत कमी केले आहे.
ट्यूशन टीचर बनला अब्जाधीश, स्टार्टअपचा ‘लखलखता तारा निखळला’, कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
२०११ मध्ये बायजूजचा पाया घातला
बायजूच्या EGM मध्ये, कंपनीच्या ६०% हून अधिक भागधारकांनी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन तसेच कुटुंबातील सदस्यांना कंपनीच्या संचालक मंडळातून काढून टाकण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. गुंतवणूकदार फर्म Prosus ने देखील कंपनीचे मूल्यांकन २२ अब्ज डॉलरवरून ५.१ अब्ज डॉलरपर्यंत कमी केले आहे. बायजूची स्थापना बायजू रवींद्रन आणि पत्नी दिव्या गोकुलनाथ यांनी २०११ मध्ये केली होती तर काही कालावधीतच बायजूजने ऑनलाईन लर्निंग ॲप म्हणून जगभर प्रसिद्धी मिळवली.
Byjus Crisis: बायजूचे हेडमास्टर रवींद्रन यांना दिसता क्षणी अटक होणार; EDकडून लुक आउट नोटीस
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले रवींद्रन यांनी २००६ मध्ये विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देण्याची सुरुवात केली तर २०१५ बायजूज लर्निंग ॲप लाँच केले. रवींद्रन यांच्या शिकवण्याची शैली आणि वेगळ्या आयडियामुळे बायजूज स्टार्टअप अवघ्या चारच वर्ष युनिकॉर्न बनला. तर करोना काळात लॉकडाऊनमुळे शाळा आणि कोचिंग बंद असल्यामुळे बायजूजने यशाचे झंडे रोवले.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *