[ad_1]

मुंबई : रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई इंडियन्सच्या संघात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. या गोष्टींचा त्रास रोहित शर्माला होत असून त्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माकडून एक तर कर्णधारपद काढून घेतले, तरी तो शांत होता. कारण कर्णधारपद काढून घेतल्यावर रोहित निराशही झाला नाही आणि त्याने याबाबत एक चकारही शब्द काढला नागी. आयपीएलच्या सुरुवातीला एक पत्रकार परीषद झाली. त्यावेळी रोहित मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल बोलला. पण कर्णधारपद आणि हार्दिक पंड्या यांच्यावर त्याने भाष्य केले नाही. पण आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्समध्ये होणारा त्रास वाढत आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार असल्याचे समोर येत आहे. पण रोहित मुंबई इंडिन्सचा संघ सोडणार कधी, हेदेखील आता समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याने रोहित शर्माला थेट सीमारेषेवर पाठवले होते. हार्दिक पंड्या यावेळी रोहितवर कोणता राग काढतोय, असे चाहते त्यावेळी म्हणत होते. पण जेव्हा गरज असते तेव्हा मात्र हार्दिक रोहितकडे मदतीला येत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर हार्दिक काहीही कारण नसताना रोहित शर्माच्या गळ्यात पडत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे हार्दिक आणि रोहित यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात आहे. रोहित शर्माला वाद-विवाद, भांडणं या गोष्टी जास्त आवडत नाहीत. त्यामुळे हार्दिक जरी काहीही करत असला तरी आपल्याला त्यामध्ये पडायचे नाही, त्यापेक्षा आपणच संघातून बाहेर पडलेले बरे, असा विचार रोहित शर्माने केल्याचे समोर येत आहे. पण रोहित शर्मा संघाबाहेर कधी पडणार, हेदेखील आता समोर येत आहे.

सूत्रांनी याबाबत माहिती दिली की, ” हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाला रोहित शर्मा हा चांगलाच वैतागला आहे. रोहितला हार्दिकशी वाद घालायचा नाही किंवा भांडण करायचे नाही. मुंबई इंडियन्सच्या संघात बरीच धुसफूस सुरु आहे. ही गोष्ट रोहित शर्माला पटलेली नाही. रोहित हा मनाविरुद्ध जास्त काळ काही करू शकत नाही. रोहित शर्माला मुद्दामून त्रास दिला जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच रोहित हा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार आहे. यावर्षी तर रोहितला मुंबई इंडियन्सला सोडता येणार नाही, पण पुढच्या वर्षी रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघात नसेल, हे आता स्पष्ट होत आहे.”

हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांची थेट मैदानातून उचलबांगडी? एमसीएच्या अॅक्शन प्लॅनची सोशल मिडियावर चर्चा

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी पाच जेतेपदं जिंकली आहेत. त्यामुळे रोहितचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे रोहितने मुंबईला सोडले तर ते कोणाबरोबर राहणार, हा सर्वात मोठा प्रश्न असेल.

(याबाबतचे पहिले वृत्त टाइम्स नाऊ या संकेतस्थळाने दिले आहे.)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *