[ad_1]

कल्याण : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही पण वाईट वाटतं, ज्या घरात काँग्रेसने १९५२ सालापासून मंत्रिपद दिलं. मंत्रीपद महत्वाचं नाही मात्र चव्हाण यांचे घराणे हे काँग्रेसच्या विचारांचे होते. शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते…दरम्यान खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना टोला लागवत आव्हाड यांनी सांगितले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नसावी. कर्तृत्वाची ओळख नसावी. फुले, शाहू, आंबेडकरांची देखील ओळख नसेल. इतिहास माहीत नसला की अशा चुका होत असतात, होत राहतात असा टोला देखील त्यांनी लगावला.

चव्हाण यांना पक्ष सोडावा लागतोय माझा विश्वास बसत नाही…

अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते. असे काय झाले की त्यांना पक्ष सोडावा लागतोय माझा विश्वास बसत नाही. मात्र जे होतंय ते दुर्दैवी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण येथे आपले मत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांनी आपले प्रतिक्रिया देताना जे होतंय ते दुर्दैवी असे म्हटले आहे.

सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली स्पर्धा ही धोकादायक गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. सत्ताधारी पक्षांमधील असलेली ही स्पर्धा आणखी धोकादायक आहे. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे स्पष्ट आहे की, विद्रोहाचा आवाज जगू देणार आहात की नाही. विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहात का. जर आवाज जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसे काम करणार हा प्रश्न आहे असे देखील ते म्हणाले.

खासदार श्रीकांत शिंदे यांना इतिहास माहित नसावा…

खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत एक वक्तव्य केलं आहे त्याबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नसावी. कर्तृत्वाची ओळख नसावी. फुले, शाहू, आंबेडकरांची देखील ओळख नसेल. इतिहास माहीत नसला की अशा चुका होत असतात, होत राहतात असा टोला देखील त्यांनी लगावला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *