विशाखापट्टणम : भारतासाठी दुसरा कसोटी सामना महत्वाचा असेल. कारण हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिकेत १-१ अशी बरोबरी करता येईल. त्यामुळे या सामन्यात भारतासाठी विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल. पण भारताला जर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागेल, याचा एकमेव मंत्र भारताच्या प्रशिक्षकांनी सांगितला आहे.भारताच्या विजयाचा एकमेव मंत्र आहे तरी काय, जाणून घ्या…“दुसऱ्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आमच्यावर कोणतेही दडपण नाही. भारतीय संघ भारतात खेळत असताना जिंकण्याची जास्त अपेक्षा असते. या अपेक्षांना सामोरे जाण्याची भारतीय संघातील खेळाडूंना सवय झाली आहे. चांगला खेळ करा, निकालाचा फारसा विचार करू नका, असेच आम्ही खेळाडूंना सातत्याने सांगत होतो. प्रतिस्पर्धीही कायम पूर्णपणे तयारीने येतात. आपणही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी जिंकलो आहोत. तेही भारतात कसोटी जिंकू शकतात, याची तयारी हवी,” असे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी एक महत्वाची गोष्ट यावेळी सांगितली आण ती म्हणजे निकालाचा विचार न करता सर्वोत्तम कामगिरी करत राहणे. जर भारतीय खेळाडूंनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर आपसूकच त्यांना विजय मिळवता येऊ शकतो. त्यामुळे निकालाचा विचार न करता भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, हे सर्वात महत्वाचे असेल.शिस्तीच्या अभावामुळे काय घडलं पाहा…” पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी अधिक शिस्तबद्ध फलंदाजी केली असती, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते, असे म्हटले जात आहे. मात्र, यात तथ्य आहे का, याचे उत्तर फलंदाजांनीच द्यायला हवे. त्यांनी योजनेनुसार खेळी करायला हवी. त्यांनी धावाही करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शॉट खेळावे लागतील. धावा कशा आणि किती करतो हे फलंदाजांसाठी महत्त्वाचे आहे. तो कसा बाद झाला हे नव्हे,” असेही राठोड म्हणाले.भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या प्रथम तीन दिवसांत चांगली कामगिरी केली होती. पण अखेरच्या दोन दिवसांत त्यांची सामन्यावरील पकड ढिली झाली आणि भारताला पहिला कसोटी सामना गमवावा लागला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *