हैदराबाद: तेलंगणाच्या सूर्यापेट ग्रामीणमधील सोशल वेल्फेअर गुरुकुल गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या आधी काही तासांपूर्वी तिनं कॉलेजमध्ये झालेल्या फेअरवेल पार्टीत सहभाग घेतला. यानंतर तिनं कुटुंबियांशी संवाद साधला होता. रात्री साडे नऊच्या सुमारास तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

सूर्यापेट ग्रामीणमध्ये सोशल वेल्फेअर गुरुकुल गर्ल्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डुग्गुपती वैष्णवीचा मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत सापडला. त्याच दिवशी संध्याकाळी वैष्णवी कॉलेज परिसरात झालेल्या फेयरवेलमध्ये सहभागी झाली होती. या पार्टीत ती आनंदात दिसत होती.
उद्धव ठाकरेंची भेट, निवडणुकीचं तिकीट; अभिषेक यांचा मॉरिसला शब्द; खून प्रकरणाला नवं वळण?
वैष्णवीनं व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आईला पार्टीची माहिती दिली. त्यावेळी ती अतिशय आनंदात, मजेत होती. काही वेळात विद्यार्थी पार्टी संपवून बाहेर पडले. वसतिगृहात पोहोचलेल्या विद्यार्थिनींना वैष्णवीचा मृतदेह दिसला. त्यांना धक्काच बसला. वैष्णवीचे आई वडील सूर्यापेट शहरातील एनटीआर कॉलनीत राहतात.
एखाद्याला इतकाही त्रास देऊ नका की…; तणाव, आरोप, कारस्थानं; मॉरिसच्या पत्नीनं सगळं सांगितलं
वैष्णवीची प्रकृती बिघडल्याचं कॉलेजकडून तिच्या आई, वडिलांना सांगण्यात आलं. सरकारी रुग्णालयात तातडीनं पोहोचण्याची सूचना त्यांना देण्यात आली. आई वडिलांनी सरकारी रुग्णालय गाठलं. आम्ही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कॉलेजचे कर्मचारी तिथून निघून गेले होते, असा आरोप पालकांनी केला. मुलीची हत्या झाल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *