मुंबई: सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. सोन्याच्या दरात घसरण झालेली दिसून येत आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सोने अजूनही घसरणीसह व्यवहार करत आहे. मात्र, आज चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. चांदी महाग झाली आहे. सोन्याच्या किमती घसरल्यामुळे सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. चला तर जाणून घेऊया सोने आणि चांदीच्या नवीनतम दरांची संपूर्ण माहिती.

सोन्याचे भाव

सोमवारी वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिल २०२४ च्या सीरीजमधील कॉन्ट्रॅक्टसाठी डिलिव्हरीसाठी सोने ६२ रुपये किंवा ०.१ टक्क्यांनी घसरून ६२२३२.०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. मागील सत्रात एप्रिलमधील कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचा दर ६२२९४.०० रुपये प्रति १० ग्रॅम होता.

GoodReturns वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार आज सोन्यात घसरण नोंदवण्यात आली आहे.

२२-२४ कॅरेट सोन्याचे दर

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर ७४,९०० रुपये प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर ७४,९०० रुपये प्रति किलो आहे.
नागपुरात २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,६९० रुपये प्रति 10 ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. नागपुरात चांदीचा दर ७४,९०० रुपये प्रति किलो आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर ५७,६९० रुपये प्रति 10 ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,९४० रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर ७४,९०० रुपये प्रति किलो आहे.
नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर ५७,८४० रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर ६२,९४० रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर ७४,९०० रुपये प्रति किलो आहे.

चांदीचे भाव

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी आज चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी, त्याचप्रमाणे, MCX वर, मार्च २०२४ मधील डिलिव्हरीसाठी चांदी ३१३ रुपये किंवा ०.४४ टक्क्यांच्या वाढीसह ७१०८७.०० रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. मागील सत्रात, मार्च कॉन्ट्रॅक्टसह चांदीची किंमत ७०७७४.०० रुपये प्रति किलो होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *