[ad_1]

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त कोयता गँग दहशत निर्माण करण्यासाठी वाहानांची तोडफोड करता होते. मात्र, आता या कोयता गँगची मजल सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात कोयता गँगने सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत त्यांच्याकडून मोबाईल, दागिने काढून घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. या घटनेमुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत.

पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली परिसरात सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. हातात कोयते नाचवत, एकावर वार करण्यात आला. तसेच वाहनांची तोडफोड करत, रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातून दागिने काढून घेतले आणि मोबाईल हिसकावून त्यांनी पोबारा केला. त्यांचा हा धांगडधिंगा सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे.
Hari Narke : महात्मा फुले यांच्या विचारांसाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन
पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या कोयता गँगने एकाच्या डोक्यात वार करून या युवकाला जखमी केलं आहे. या घटनेत जवळपास नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आली असून दोन महिलांचे दागिने आणि सहा मोबाईल हिसकावून या कोयता गँगच्या चोरांनी चोरून नेले आहेत. चौघांनी माजवलेल्या दहशतीने परिसरातील नागरिक भयभीत आहेत. या आरोपींचा माज मोडण्यासाठी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला असून त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

चिखली नंतर रावेत या ठिकाणी देखील या गँगने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी या प्रकाराला न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी केलं आहे.
देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा, पंतप्रधान मोदींनाही जीवे मारण्याची धमकी, दीनानाथ रुग्णालयाला मेल

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *