[ad_1]

धुळे: मुंबई आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात धुळे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. किरण अहिरराव हे भाजपचे आक्रमक नगरसेवक म्हणून अशी ओळख असणारे किरण अहिरराव हे संपूर्ण शहरात आणि भाजपमध्ये अत्यंत प्रसिद्ध होते, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik Chandwad Accident: भरधाव कार-कंटेनरचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू; भाजप नगरसेवकाचा समावेश

मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जवळील वडाळी भोई नमोकार तीर्थ या भागात आज सकाळच्या सुमारास नाशिकहून धुळ्याकडे येणाऱ्या कार आणि कंटेन चा भीषण अपघात झाला असून या अपघातात धुळे शहरातील मेहंदळे या परिसरात राहणारे प्रभाग क्रमांक सहाचे भाजपच नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भाजपामध्ये तसेच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. अपघातात मृत पावलेल्या किरण अहिरराव यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही त्यांनी त्यांच्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणण्यापासून केली होती. यानंतर मेहंदळे गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या पत्नीला निवडून आणल्यानंतर त्यांनी आपला राजकीय दबदबा वाढवला होता.

Nashik: कंटेनरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा, पत्र्याचा चेंडूसारखा गोळा; भाजप नगरसेवकाचा शेवटचा प्रवास ठरला

किरण अहिरराव यांच्या राजकीय कार्याची दखल घेत २०१९ च्या झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने त्यांना राखीव गटातून उमेदवारी न देता खुल्या प्रवर्गातून तिकीट दिल्यानंतर देखील किरण अहिरराव हे भरघोस मताधिक्याने विजयी झाले होते. भाजपचे आक्रमक नगरसेवक म्हणून किरण अहिरराव यांची विशेष ओळख होती. तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख प्रचलित होती. त्यांच्यातील आक्रमकपणा लक्षात घेऊन भाजपाने त्यांना स्थायी समिती सदस्यपदी देखील संधी दिली होती. आपल्या प्रभागातील विकास कामांसाठी तसेच नागरिकांच्या अडीअडचणींसाठी धावून जाणारे नगरसेवक किरण अहिरराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रभागात देखील मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *