[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाजप ‘महामंथन’ करणार असून, येत्या १७ व १८ फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची दोन दिवसीय बैठक होणार आहे. त्यासाठी उपस्थित राहणाऱ्या हजारो नेत्यांना पंतप्रधान नरेद्र मोदी लोकसभा निवडणुकीतील फेरविजयाचा ‘महामंत्र’ देणार आहेत. या बैठकीसाठी भाजपच्या देशभरातील हजारो नेत्यांना बोलावण्यात आले आहे. राम मंदिर व कलम ३७०सारख्या संघाच्या सांस्कृतिक अजेंड्यावरील मुद्द्यांची पूर्तता व वर्षानुवर्षांची आश्वासने पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन करणारा खास ठराव या बैठकीत मंजूर केला जाईल. गरीब कल्याण व अन्य योजनांबाबतचाही ठराव असेल.

२०१९प्रमाणेच मोदी यानिमित्त पटेल चौकापासून रोड शो करण्याची शक्यता आहे. या ‘महामंथन’चे स्थळ अजून गुलदस्त्यात असले तरी जंतर मंतर भागातील नवी दिल्ली महापालिका परिषदेच्या (एनडीएमसी) भव्य इमारतीत ही बैठक होऊ शकते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत भाजपचे राज्यसभा आणि लोकसभा खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य व अनेक माजी खासदारांना बोलावण्यात आले आहे. सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय पदाधिकारीही यात सहभागी होणार आहेत. प्रदेश पदाधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य, शिस्तपालन समिती, वित्त समिती, निवडणूक समिती, माजी प्रदेशाध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. लोकसभा क्लस्टर प्रभारी, लोकसभा प्रभारी, लोकसभा निमंत्रक आणि लोकसभा विस्तारक, सर्व राष्ट्रीय व राज्यांतील प्रवक्ते, राज्यांचे माध्यम समन्वयक, राज्य सोशल मीडिया, आयटी समन्वयक, आघाड्यांचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस, सेलचे राज्य संयोजक; तसेच देशभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींचे अध्यक्ष/उपाध्यक्ष यांनाही दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. पाच हजारांहून अधिक नेते बैठकीत सहभागी होणार असलेल्या यात भाजपची लोकसभा निवडणुकीसाठीची यंत्रणा सज्ज केली जाणार आहे.

भाजप-शिंदे गटात भडका, गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

दीडशे उमेदवारांची घोषणा लवकरच?

मागील वर्षी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा रणधुमाळीत निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील पक्षाच्या शेकडो उमेदवारांची घोषणा केली होती. लोकसभेच्या त्या उपांत्य फेरीत भाजपने काँग्रेसवर ३-१ अशी मात केल्यावर पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. तोच कित्ता गिरवून भाजपचे सर्वोच्च नेतृत्व लोकसभा निवडणुकीसाठीही अत्यंत नजीकच्या काळात आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची दाट चिन्हे आहेत. मार्चमध्ये प्रस्तावित असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधी किमान सुमारे १५० उमेदवारांची नावे भाजप घोषित करेल. यात ज्या जागांवर भाजप कधीही जिंकलेला नाही, अशा जागांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल असे पक्षसूत्रांनी सांगितले.

राम मंदिराच्या पायऱ्यांवर संविधानाचं रक्त; खासदार अमोल कोल्हेंची कविता, मोदी सरकारचा पाढा वाचला

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *