[ad_1]

मुंबई- हृतिक रोशन हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. त्याने २३ वर्षांपूर्वी ‘कहो ना…प्यार है’मधून पदार्पण केले होते. यानंतर त्याने आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. गेल्या काही वर्षांत त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अ‍ॅक्शन असो वा ड्रामा, प्रत्येक शैलीतील चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले. चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले. एवढेच नाही तर त्याचा चित्रपट ‘कोई.. मिल गया?’नेही चाहत्यांना वेड लावले होते. रोहित मेहराच्या व्यक्तिरेखेची आजही खूप चर्चा होते. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटात त्याला ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली, तशीच वागणूक खऱ्या आयुष्यातही ऋतिकला सहन करावी लागली होती.

हृतिकची ‘या’ अभिनेत्री सोबत डिनर नाईट पार्टी


कोई.. मिल गया? मध्ये हृतिक रोशनने रोहित मेहराची भूमिका साकारली होती. यामध्ये लहानपणापासूनच त्याचा मानसिक विकास होत नाही असे दाखवलेले, त्यामुळे तो १८ वर्षांचा असूनही ८-९ वर्षांच्या मुलांप्रमाणे वागायचा. त्यात त्याने ज्या पद्धतीने अभिनय केला, त्याचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आता खुद्द अभिनेत्याने या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले आहे. लहानपणी आपला कसा छळ झाला हे देखील त्याने सांगितले आहे.

‘ब्रह्मास्त्र’साठी शाहरुखने १ रुपयाही घेतला नव्हता, करण जोहरने सांगितला अभिनेत्याचा दिलदारपणा
बालपणी असेच घडलेले

हृतिक रोशन म्हणाला, ‘मी रोहितच्या पात्राशी पूर्णपणे रिलेट करू शकतो. मी मोठा होत असताना, माझ्या हकलत बोलण्याच्या सवयीने मला खूप त्रास दिला गेला. ज्या दिवशी मला शाळेत जायचे नव्हते त्या दिवशी मी आईसमोर रडायचो. खरं तर, राज आणि त्याचे मित्र रोहितची स्कूटर फोडतात तो सीन माझ्यासोबत घडला होता. माझ्याकडे BMX सायकल होती, जी माझ्यासाठी खूप काही होती. पण एके दिवशी काही मोठ्या मुलांनी माझी सायकल तोडली. त्यामुळे चित्रपटात रोहितसोबत जे घडलं, ते आयुष्य मला आधीच अनुभवायला मिळालं होतं.
सिनेमांत येण्यापूर्वी आलिया करत होती इंजिनियर मुलाला डेट, प्रसिद्धी मिळाली अन् आला दुरावा
हा चित्रपट २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता

कोई मिल गया, ८ ऑगस्ट २००३ रोजी प्रदर्शित झालेला हा भारतातील पहिला विज्ञान-कथेवरील आधारित चित्रपट होता. २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी तो पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केला आहे. यामध्ये रोहित व्यतिरिक्त जादू ही सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखा मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण करणारी होती. अभिनेता म्हणाला की हा चित्रपट, तसेच क्रिश फ्रँचायझी, त्याच्या आवडत्या आणि संस्मरणीय प्रकल्पांपैकी एक आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *