[ad_1]

मुंबई- आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात शाहरुख खानने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याने ‘वानरास्त्र’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. शाहरुखने काही मिनिटांच्या स्क्रीन स्पेससाठी १८ दिवस शूट केले. चित्रपटातील त्याची भूमिकाही मारामारी करणारी होती त्यामुळे तो प्रचंड घामाटलेला. एवढी मेहनत करूनही शाहरुखने निर्माता करण जोहरकडून पैसेही घेतले नाहीत. करण जोहरने नुकताच हा किस्सा सांगितला.

अखेरपर्यंत छत्री आडवी केली; नवा लूक न दाखवताच शाहरुख निघून गेला

करण जोहरने एका नवीन मुलाखतीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील छोट्या भूमिकेसाठी शाहरुख खानशी संपर्क का केला नाही याबाबत सांगितले. जेव्हा करणला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सुचरिता त्यागीला सांगितले की, ‘शाहरुखने ‘ए दिल है मुश्किल’मध्ये माझ्यासाठी सर्वात निर्णायक सीन केला होता आणि त्यासाठी मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन.’

शाहरुख की रणवीर ? डॉन ३ मध्ये कोण? उत्तरासाठी पाहावा लागणार गदर २
‘ब्रह्मास्त्र’चे १८ दिवस शूटिंग, पैसेही घेतले नाहीत

करण पुढे म्हणाला की, मी शाहरुखसोबतच्या आमच्या खास नात्याचा असा वापर करु शकत नाही. हा विशेषाधिकार वापरू शकत नाही आणि त्यासाठी मी त्याच्यावर दबावही टाकू शकत नाही. त्यानंतर करणने खुलासा केला की, शाहरुख खानने कोणताही आर्थिक व्यवहार न करता १८ दिवस ‘ब्रह्मास्त्र’चे शूटिंग केले होते. तो म्हणाला की, शाहरुखने त्या मोठ्या सीनसाठी आपले मन, वेळ, शरीर आणि सर्वकाही दिले. पुन्हा त्यांच्याकडे गेल्यास अतिरेक होईल, असे मला वाटते.

जुळ्या मुलींची नावं झिया आणि जायदा का ठेवली? समीर वानखेडेंनी सांगितली नावांमागची गोष्ट
शाहरुखचा विनाकारण वापरणार नाही

करण जोहर म्हणाला की शाहरुख त्याला कधीच नाही म्हणत नाही आणि त्यामुळेच मी त्याच्याकडे जात नाही. तो म्हणाला, ‘मला वाटतं तुला ते कार्ड खूप जवळ ठेवावं लागेल. मी ते वापरेन कारण मी शाहरुखकडे तसाही जाऊ शकतो. पण मला त्याला अनावश्यकपणे वापरायचे नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *