[ad_1]

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आता इंग्लंडच्या संघाने आपला हुकमी ए्क्का बाहेर काढला आहे. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या कसोटीसाठी आपला ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात इंग्लंडच्या संघान दोन मोठे बदल केले आहेत. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या संघाने दमदार विजय मिळवला होता. सामना जिंकला तर शक्यतो संघ बदलला जात नाही. पण दुसऱ्या सामन्यात आता इंग्लंडच्या संघाने दोन मोठे बदल केले आहेत. इंग्लंडने फार शिताफिने आपला हा संघ निवडला आहे. कारण येथील खेळपट्टी ही फिरकीला मदत तर करणार आहेच, पण चांगला रीव्हर्स स्विंगही यावेळी पाहायला मिळू शकतो. त्यामुळे इंग्लंडने संघ निवडताना या दोन गोष्टींचा सखोल विचार केला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने यावेळी दोन मोठे बदल केले आहेत. इंग्लंडच्या संघात यावेळी हुकमी एक्का परतला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये जगभरात आपली ओळख निर्माण करणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यावेळी इंग्लंडच्या संघात परतला आहे. त्यामुळे आता इंग्लंडची गोलंदाजी अधिक बळकट होणार आहे. कारण जेम्स अँडरसनला रिव्हर्स स्विंगचा बादशाह समजले जाते. त्यामुळे चेंडू नवीन असताना त्याला स्विंग करणे आणि जुना झाल्यावर रीव्हर्स स्विंग करणं, या दोन्ही गोष्टी तो शिताफिेने करू शकतो. त्यामुळे हा पहिला सर्वात मोठा बदल इंग्लंडच्या संघात झाला आहे. इंग्लंडच्या संघात दुसरा बदल हा फिरकी गोलंदाजीत झाला आहे. इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच हा पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. जॅकच्या जागी आता इंग्लंडच्या संघात शोएब बशिरची एंट्री झाली आहे. शोएब हा एक युवा गुणवान फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजीला चांगली धार येऊ शकते.इंग्लंडच्या संघाने जेम्स अँडरसनच्या रुपात एक मोठे शस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत अँडरसन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *