[ad_1]

मुंबई– महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या गळ्यातील ताईत असलेल्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी एक घोषणा करत चाहत्यांना चकीत केलं आहे. त्यांनी आपल्या गाण्यांनी चाहत्यांना तर वेड लावलंच मात्र आपल्या सूर तालांवर अनेकांना थिरकायला भाग पाडलं. लवकरच त्या वयाची नव्वदी गाठणार आहेत. त्या येत्या ८ सप्टेंबर रोजी ९० वर्षाच्या होणार आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक अनोखा कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्या चाहत्यांना अनोखी भेट देणार आहेत. असा कार्यक्रम यापूर्वी कुणीही पाहिला नसेल. आपल्या वाढदिवशी त्या दुबईत एक मोठा शो करणार आहेत. आणि या कार्यक्रमात त्या सलग तीन तास गाणार आहेत. वयाच्या ९० व्या वर्षी आशा भोसले हे शिवधनुष्य पेलणार आहेत.

OMG 2 च्या स्क्रिनिंगला अक्षय कुमारची हजेरी

आशा भोसले या अनेकांच्या लाडक्या गायिका आहेत. त्यांचा आवाज एका वेगळ्यात जगाची सफर करवून आणतो. त्या आजही मुंबई- पुणे सारख्या शहरांमध्ये शो करत असतात. मात्र ८ सप्टेंबर रोजी सादर होणारा कार्यक्रम हा रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी ९० वर्षाची झाली असं लोकांना वाटतं. मला असं वाटतं की आताच तर हे घडलं होतं. मला वाटतच नाही की मी मोठी झालीये. मला हे पण नाही वाटत की मी वेगळं काही केलंय. तो वर बसलाय तो सगळं काही करून घेतोय. मी फक्त करतेय. पण यांनी जेव्हा मला सांगितलं की त्यांना कार्यक्रम करायचाय, तोदेखील खूप मोठा, जसा माझ्या मनात आहे तसा. तर मी म्हणाले, एवढे कलाकार कोण घेऊन जाणार? असं नाही की मुंबईत आहे, पुण्यात आहे. थेट दुबईत. कसं होणार हे?’


पुढे आशा भोसले म्हणाल्या, ‘१८ संगीतकार, नृत्यकलाकार, सगळा खटाटोप कसा करणार? ते म्हणाले ते करतील आणि खरंच त्याची तयारी सुरू झालीये. आम्ही रिहर्सल करतोय.’ हे जग खरंच पहिल्यांदा असं काहीतरी पाहणार आहे. वयाची नव्वदी गाठलेल्या आशा भोसले सलग तीन तास गाणं सादर करणार आहेत. असं करणाऱ्या कदाचित त्या पहिल्याच कलाकार असतील.

जिला मुलगी म्हणायला नकार दिला; मृत्यूनंतर तिनेच सांगितला दादा कोंडकेंच्या संपत्तीवर हक्क[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *