[ad_1]

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस. नेटकरी, चाहत्यांनी प्राजक्ताला सोशल मीडियावरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींनी प्राजक्ताला हटके पोस्ट , फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. प्राजक्ताची सहकलाकार आणि मैत्रिण अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं देखील लाडक्या प्राजूला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

मैत्रीची चर्चा

दरम्यान, प्राजक्ता आणि सई या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून त्या भेटीला येत असतात. या कार्यक्रमाची संपूर्ण टीम चाहत्यांना हसवण्यात कुठंही मागं पडत नाही. छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त गाजणारा हा कार्यक्रम गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला आणि सिनेसृष्टीला अनेक नवीन चेहरे दिले.

या कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर परिक्षकाच्या खुर्चीत आहेत. प्राजक्ता या शोची होस्ट आहे. हास्यजत्रेतल्या कलाकारांची सेटवरची धम्माल मस्ती अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळते . ‘तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा’, हे अभिनेत्री प्राजक्ता माळीचं या कार्यक्रमातील वाक्य अनेकांच्या आवडीचं आहे. या शोमध्येही दोघींची मैत्री पाहायला मिळते.

सईनं इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर करत प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सईनं प्राजक्तासोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोवर तिनं लिहिलंय की, ‘हॅपी बर्थडे प्राजू. आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटतेय तुझ्या वतीने…लव्ह यू’. सईनं शेअर केलेल्या या पोस्टची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

तर प्राजक्ता अनेकदा सईचं कौतुक करताना दिसते. सईचं कौतुक करताना प्राजक्ता म्हणाली होती की, प्राजक्ता म्हणाली की, सई मला खूप प्रेरित करते. प्रोफेशनल लाइफ कसं असावं यासाठी मी तिचं निरिक्षण करत असते. ती सेटवरही अगदी प्रतिष्ठित व्यक्ती असल्यासारखं वागते. काही फाफटपसारा नाही, गप्पाटप्पा नाही. ती तिची खुर्ची सोडत नाही. ज्याला बोलायचं असतं, तो तिच्या खुर्चीजवळ जाऊन बोलतो. ती खुर्चीतून थेट व्हॅनिटीमध्ये जाते, व्हॅनिटीतून थेट खुर्चीत येऊन बसते. हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *