[ad_1]

मुंबई : उद्योजक गौतम अदानी त्यांच्या अदानी विल्मर या कंपनीतील भांडवलाची मोठ्या व्यवहाराद्वारे विक्री करू शकतात. एका अहवालानुसार, गौतम अदानी अदानी विल्मरमधील ४४% भांडवल विकण्याचे नियोजन करीत असल्याचे समजले आहे. अदानी विल्मार हा अदानी समूहाचा सिंगापूरस्थित विल्मार समूहासोबतचा संयुक्त उपक्रम आहे.

खरेदीला सुपरहिट स्टॉक! औषध निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी, तपशील वाचून खरेदी करा
अदानी समूह किती टक्के हिस्सेदारी विकणार
अदानी विल्मरच्या सध्याच्या मूल्याबद्दल बोलायचे तर ते सुमारे ६.१७ अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांची अदानी विल्मारमधील 44 टक्के हिस्सेदारी सुमारे २.७ अब्ज इतकी आहे मात्र, कंपनीतील हिस्सा विकण्याची ही योजना अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी या प्रकरणी अदानी समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

तिमाही निकालात अदानी विल्मारला तोटा
ब्लूमबर्गने अहवाल दिला की भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब विक्रीनंतर वैयक्तिक क्षमतेमध्ये अल्प भागभांडवल राखू शकतात, तर विल्मर व्यवसायातील आपला हिस्सा कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. गेल्या आठवड्यात, अदानी विल्मरने पहिल्या तिमाहीत तोटा नोंदवला.

Multibagger Stock: हा शेअर आहे, की पैसे छापायची मशीन? टाटांच्या स्टॉकचे छप्परफाड रिटर्न; तुम्ही घेतला का?
त्याच वेळी, अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने या वर्षाच्या सुरुवातीला समूहाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सचे बाजार मूल्य सुमारे १४७ अब्ज डॉलरने कमी झाले आहे.

अदानी विल्मर कंपनीचे कामकाज
ही कंपनी खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, कडधान्ये आणि साखरेसह स्वयंपाकघराशी संबंधित अत्यावश्यक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली एक FMCG कंपनी असून जानेवारी १९९९ मध्ये अदानी ग्रुप आणि विल्मार ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून याची सुरुवात झाली. सध्या कंपनीचे भारतातील १० राज्यांमध्ये २३ प्लांट आहेत.

Zomato शेअर तेजीच्या ट्रॅकवर, गुंतवणूकदारांच्या जीवात जीव! आता खरेदी करावा? तज्ञ म्हणतात…
अदानी विल्मर शेअर कोसळला

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरच्या शेअरमध्ये बुधवारच्या सत्रात मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात शेअर पाच टक्क्यांपर्यंत घसरला असून अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये १% हून अधिक वाढ दिसून आली. अदानी एंटरप्रायझेस अदानी विल्मारमधील भागभांडवल विकण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तामुळे शेअर्समध्ये अस्थिरता दिसून आली.

तेलाच्या किमती घसरल्याने नुकसान
गेल्या आठवड्यात अदानी विल्मरने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले ज्यात खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला. पहिल्या तिमाहीत अदानी विल्मरचा एकत्रित महसूल १२% घसरून १२ हजार ९२८ कोटी रुपयांवर आला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *