१) जर भारताने आज विजेतेपद मिळवले तर १९८३ आणि २०११ नंतर हे त्यांचे तिसरे वर्ल्डकप विजेतेपद ठरेल. भारत हा पहिला असा देश ठरले जो घरच्या मैदानावर दोन वर्ल्डकप जिंकले. याआधी त्यांनी २०११ साली श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
२) विराट कोहलीने या स्पर्धेत ७११ धावा केल्या आहेत. एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्याने वनडेतील ५०वे शतक झळकावले होते. अंतिम सामन्यात जर त्याने ८९ धावा केल्या तर वर्ल्डकपमध्ये ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल.
३) भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर वर्ल्डकपमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. जर आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शतक केले तर ही आघाडी अजून वाढवता येईल. रोहितने वर्ल्डकपमध्ये ७ शतक केली आहेत.
४) रोहितने या स्पर्धेत ५५० धावा केल्या आहेत. २०१९ साली त्याने ६४८ धावा केल्या होत्या. आज त्याने ९९ धावा केल्यास स्वत:चा विक्रम मोडण्याची संधी आहे.
५) मोहम्मद शमीने ३ वर्ल्डकपमध्ये ५४ विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात जर शमीने ३ विकेट घेतल्या तर तो वसीम आक्रम आणि लसित मलिंगा यांच्या ५५ आणि ५६ विकेटचा विक्रम मागे टाकू शकेल. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज ठरले.
६) श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत २४ धावा केल्यास सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर एका स्पर्धेत ५५० धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज होऊ शकेल.
७) केएल राहुलने अंतिम सामन्यात ३४ धावा केल्या तर तो महान कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या ७८० धावांचा विक्रम मागे टाकले. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा आठवा फलंदाज ठरले.
Read Latest Sports News And Marathi News