[ad_1]

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानं भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. गेल्या दशकभरापासून भारताला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदाच्या स्पर्धेत सलग १० सामने जिंकत भारतानं अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे यंदा वर्ल्डकप जिंकून आयसीसी स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ संपेल अशी आशा क्रिकेट चाहते बाळगून होते. पण ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत शानदार कामगिरी करत सहाव्यांदा जेतेपद पटकावलं. यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला.भारतानं अंतिम सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शिव्यांचा भडिमार सुरू झाला. काहींनी तर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जिमी निशामलाही सोडलं नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन वेगळे देश आहेत हे समजून घ्या, असं म्हणत निशामनं ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर दिलं. मूळची भारतीय असलेली ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमणला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक फलंदाज बाद करणाऱ्या फिरकीपटू ऍडम झॅम्पालादेखील टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. झॅम्पानं अंतिम फेरीत मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर सलामीवीर शुभमन गिलचा सोपा झेल घेतला. त्यामुळे भारताला पहिला धक्का बसला होता. त्यावरुन झॅम्पानं गिल को आऊट कर के अपनी औकात दिखा दी स्वरुपाच्या कमेंट्स त्याच्या अकाऊंटवर करण्यात आल्या. काही कमेंट्समध्ये शिव्या देण्यात आल्या. ट्रोलर्स शिवीगाळ करताना, आक्षेपार्ह कमेंट्स करताना इतके बेभान झाले होते की आपण भलत्याच ऍडम झॅम्पाला ट्रोल करतोय हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. स्लोवाकियाचा स्की रेसर आणि पायलट असलेल्या ऍडम झॅम्पाला ट्रोल करण्यात आलं. आपण दुसऱ्याच झॅम्पाला ट्रोल करतोय हे नंतर त्यांच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत त्यांनी लाज घालवून घेतली होती आणि परदेशी नागरिकासमोर स्वत:च्या देशाचीही शोभा करुन घेतली होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *