[ad_1]

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर सुनावणी झाली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी याला विरोध केला होता. तर, मराठवाड्यातील लोक प्रतिनिधी पाणी मिळावे यासाठी लढा देत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयानं नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कारखानदारांकडून करण्या आलेल्या हस्तक्षेप याचिकेतील ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला नकार दिला. यामुळं मराठवाड्यातील जनतेला दिलासा देणारा निर्णय घेत पाणी सोडलं जाऊ शकतं. त्यामुळं आता मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडाण्याचा निर्णय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत जलसंपदा विभाग मुंबई यांच्या आदेशनानं घेतला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे..नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी जायकवाडी धरणासाठी सोडावं म्हणून माजी आमदार कल्याणराव काळे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टातील वकील योगेश अहीरराव आणि वकील युवराज काकडे यांनी या संदर्भात माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी १२ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळं मराठवाडा येथील जनतेला लाभ होणार आहे, असं वकिलांनी म्हटलं. मराठवाड्याला साडे आठ टीएमसी पाणी मिळावं म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. जायकवाडी धरणातील पाणी साठा ६५ टक्केंच्या जवळपास असावा यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. एकूण ८. ६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये पाणी वाहून जाताना तूट देखील लक्षात घेण्यात आली होती.दरम्यान, जायकवाडीला पाणी सोडू नये याबाबत सर्वोच्च न्यायालयासह उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आदेश होत नाही, तोपर्यत सर्वोच्च न्यायालयाला निकाल देता येणार नाही. उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला त्याबाबत सुनावणी होणार आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर १२ डिसेंबरनंतर सर्वोच्च न्यायलयात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय सद्यस्थितीत अधांतरीच राहिला आहे. Read Latest And

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *