ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंड असलेल्या ठाण्यातच शिवसेना आणि भाजप यांच्यातला वाद पेटला आहे. आधी शाब्दिक चकमकी सुरू होत्या. आता प्रकरण थेट गोळीबारापर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या आमदारानं उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यातच शिंदेंच्या शिवसेनेच्या शहर प्रमुखावर पाच गोळ्या झाडल्या. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधाल वाद विकोपाला गेला आहे.जमिनीच्या वादातून भाजप आमदार यांनी महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाण्यात गायकवाड विरुद्ध गायकवाड असा संघर्ष सुरू आहे. त्याचं पर्यवसन काल गोळीबारात झालं आणि शहरात खळबळ उडाली. कल्याण लोकसभेवरुन सुंदोपसुंदीएकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या कल्याणचे खासदार आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा निवडून गेले. २०१९ मध्येही त्यांनी सहज विजय मिळवला. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली. शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर शिंदे आणि एकनाथ गायकवाड यांच्यातला वाद टोकाला गेला. कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा. इथून भाजपचा उमेदवार सहज विजयी होईल, अशी भूमिका ते सातत्यानं मांडत आहेत. कल्याण मतदारसंघ भाजपनं घ्यावा यासाठी ते आग्रही आहेत. कल्याण लोकसभेत येणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांची हीच इच्छा आहे. महेश गायकवाडांमागे श्रीकांत शिंदेंची ताकदगणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांना श्रीकांत शिंदेंचं पाठबळ आहे. महेश गायकवाड माजी नगरसेवक आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून श्रीकांत यांनी गायकवाड यांना सातत्यानं ताकद दिली. त्यामुळे शहरप्रमुख असलेले महेश गायकवाड आमदार असलेल्या गणपत गायकवाड यांना आव्हान देत आहेत. गणपत गायकवाड १५ वर्षांपासून कल्याण पूर्वचे आमदार आहेत. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची महेश गायकवाड यांची इच्छा आहे.शिंदेंना नडणाऱ्या गणपत गायकवाड यांच्यामागे कोण?गणपत गायकवाड २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते अपक्ष उमेदवार होते. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडून आले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. उद्योजक असलेल्या गायकवाड यांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. त्यांचा मुलगा वैभव कल्याण भाजपचा युवक जिल्हा प्रमुख आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *