[ad_1]

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपला दृष्टिकोन बिनधास्त मांडते. आपल्या वक्तव्यांचा पुढे काय परिणाम होईल याकडे ती फारसे लक्ष देत नाही. त्यामुळेच कित्येकदा ती वादात देखील सापडले. अलीकडेच कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘बाई एक वॉशिंग मशीन आहे का’ असे विचारताना दिसत आहे.
खरंच नील नितीन मुकेशने केलेला शाहरुख खानचा अपमान? अभिनेत्याने सांगितलं खरं काय घडलेलं
‘स्त्री वॉशिंग मशीन आहे का’

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अभिनेत्रीच्या एका व्हिडिओमध्ये ती असे म्हणताना ऐकू येते की, “सहमतीच्या नातेसंबंधात, नेहमी स्त्रियांचा वापर होतो आणि त्याचा आनंद घेणारा पुरुष का असतो? हे कसं काम करतं? स्त्री ही वॉशिंग मशीन आहे, जी वापरली जाते? कशाबद्दल आहे? जर ते संमतीचे नाते असेल, आणि पुरुषाने जर त्याचा आनंद घेतला तर स्त्रीनेही त्याचा तितकाच आनंद घेतला पाहिजे.” कंगणाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हिरॉइन होण्याच्या नादात कुटुंबाला पोरकी झाली ही अभिनेत्री, हॉलिवूडमध्येही केलंय काम
या चित्रपटांमध्ये दिसणार कंगना

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी २’ आणि ‘इमर्जन्सी’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘इमर्जन्सी’मध्ये ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अनारकली ड्रेसमध्ये स्पेशल लूक, अर्पिताच्या ईद पार्टीला कंगना रणौतची हजेरी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *