मुंबई : भारताला पहिला विश्वचषक कपिल देव यांनी जिंकवून दिला होता. १९८३ साली भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती. आता भारताचे हे महान खेळाडू शेती करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. कारण कपिल देव यांनी आता महाराष्ट्रामध्ये शेती करण्यासाठी जमिन विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. कपिल देव यांनी मुंबईजवळ किती एकर जमिन विकत घेतली असून त्यासाठी किती करोडो रुपये मोडले आहेत, ही माहिती आता समोर आली आहे.

बरीच सेलिब्रेटी मंडळी आता शेतीकडे वळली आहेत. ऑरगॅनिक शेती करण्यासाठी आता बऱ्याच जणांचा कल आहे. यामध्ये आता कपिल देव यांचे नावही सामील झाले आहेत. कपिल देव खरं तर पंजाबचे. पंजाबमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी हरीत क्रांती झाली होती. पण तरीही त्यांनी शेती करण्यासाठी आता महाराष्ट्र गाठले आहे. कपिल देव यांनी जमिनीच्या व्यवहार केला, हे काही दिवस गुप्त ठेवण्यात आले होते, पण अखेर ही गोष्ट समोर आली आहे. कपिल देव यांनी १६ एकर जागा विकत घेतली आहे. त्यासाठी त्यांनी आठ कोटी रुपये खर्च केले आहेत, त्याचबरोबर त्यांना या जमिनीच्या खरेदीसाठी १.०३ कोटी रुपये स्टम्प फी भरावी लागणार आहे. ही जमिन मुंबईच्या नजीर असलेल्या कर्जतच्या नेरळ येथे आहे. ही जमिन मोग्रज गावाच्या पायथ्याशी आहे. या जमिनीपासून काही अंतरावर सुप्रसिद्ध असलेला सोलनपाडा धबधबा आहे. पर्यटक या धबधब्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. नेरळ येथील प्रभारी सहनिबंधक मंगेश चौधरी यांच्या निरीक्षणाखाली हा व्यवहार झाला आहे आणि त्यांची नोंदणीही करण्यात आली आहे. कपिल देव यांनी जी जमिन विकत घेतली आहे, ती तुळशीराम गायकर यांच्या मालकीची होती. यापूर्वी कपिल देव यांनी कोथिंबे गावामध्ये २०२२ साली २५ एकर जागा विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या दोन जमिनी घेऊन कपिल देव नेमकं करणार तरी काय, याची उत्सुकता आता सर्वांना असेल.

विश्वचषक विजयाचे शिल्पकार कपिल देव यांचा वाढदिवस!

कपिल देव यांनी आता महाराष्ट्रात दोन मोठ्या जमिनी विकत घेतल्याचे समोर येत आहे. २०२२ साली त्यांनी २५ एकर जमिन घेतली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील कर्जत येथे आता १६ एकर जागा विकत घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात कपिल देव कोणती शेती करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *