नवी दिल्ली : रवींद्र जडेजाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. पण आता जडेजाच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे तो आता यापुढील कसोटी सामन्यात खेळणार की नाही, हे आता समोर आले आहे.
रवींद्र जडेजाला कशी झाली होती दुखापत…
रवींद्र जडेजा हा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भन्नाट फॉर्मात होता. पहिल्या डावात जडेजाने भारताचा डाव सावरला होता आणि त्यामुळेच संघाला मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले होते. पण याच पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने धावचीत केले होते. त्यानंतर जडेजा लंगडत चालत असल्याचे पाहायला मिळाले होते. जडेजाच्या पायाचे स्नायू यावेळी दुखावले गेले होते. जडेजाची ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही.

जडेजा सध्या आहे तरी कुठे….
जडेजाच्या दुखापतींवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवण्यासाठी जडेजाला बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ठेवण्यात आले आहे. जडेजाच्या दुखापतींचे पुनर्वसन हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होईल.

जडेजा भारतीय संघात कधी परतू शकतो…
जडेजा सध्या आपल्या दुखापतींवर उपचार घेत आहे. या दुखापतीमधून बरं झाल्यावर तो थेट भारतीय संघात येऊ शकत नाही. कारण दुखापतीमधून सावरल्यावर जडेजाला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये जर जडेजा पास झाला तरच त्याला भारतीय संघात येता येणार आहे. जर जडेजा फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही तर त्याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही.

जडेजाच्या दुखापतीबाबत कोणती मोठी अपडेट आली आहे….

जडेजाबाबतची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये जडेजा आपल्या दुखापतींवर उपचार घेत असल्याचे दिसत आहे. जडेजा हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असल्याचे वाटत आहे. या फोटोवरून तरी जडेजा हा लवकर फिट होईल, असे वाटत नाही. त्यामुळे जडेजा आता बहुतेक या संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

एकीकडे बायकोला साथ देण्याचं कर्तव्य आणि दुसरीकडे बहिणीच्या विरोधात लढण्याचं आव्हान, जाडेजा धर्मसंकटात

जडेजाची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे तो आता कसोटी मालिकेत कमबॅक करेल, असे सध्याच्या घडीला तरी त्याच्या फोटोवरून दिसत नाही. त्यामुळे आता बीसीसीआय जडेजाबाबतची माहिती नेमकी कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *