[ad_1]

मुंबई- आपल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लासोबत प्रेमाने खेळणाऱ्या या गोंडस चिमुरडीने २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन खळबळ उडवून दिली होती. ही मुलगी जेव्हा मोठी होऊन हिरॉइन बनली तेव्हा तिने चित्रपटांमध्ये बऱ्याच गोष्टी केल्या. तिने चित्रपटांमध्ये खूप इंटिमेट आणि किसिंग सीन दिले. हॉलिवूडमध्येही तिनं खूप नाव कमावलं. पण या मुलीने अभिनेत्री होण्यासाठी आपल्या आई-वडिलांचाही त्याग केला होता. हा कोणत्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो आहे सांगू शकाल का? कोण आहे ही गोंडस मुलगी?

या मुलीचे कनेक्शन हरियाणातील जाट समाजासोबत आहे. तिच्या कुटुंबातील कोणत्याही मुलीला हिरॉईन बनण्याचे स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण तिने केवळ स्वप्नच पाहिले नाही तर ते पूर्णही केले. मात्र, या सर्व गोष्टींमुळे तिला तिच्या कुटुंबाचा त्याग करावा लागला.

अभिनेत्रीचे बालपण आणि कुटुंब

ही मुलगी दुसरी कोणी नसून मल्लिका शेरावत आहे. मल्लिका शेरावतचे बालपणीचे नाव रीमा लांबा होते. तिचा जन्म हरियाणातील हिसार येथे असलेल्या मोथ नावाच्या छोट्या गावात झाला. मल्लिका शेरावतच्या वडिलांचे नाव मुकेश कुमार लांबा आणि आईचे नाव संतोष शेरावत आहे. मल्लिकाने आपल्या स्क्रिन नेमला आईचे नाव दिले कारण त्यांनी तिला पाठिंबा दिला होता.

mallika sherawat pic

ज्या दिवशी ती घरातून निघून गेली त्याच दिवशी तिच्या आई-वडिलांसोबतचे नाते तुटले.

दुसरीकडे, करिअर आणि पालकांबद्दल, अभिनेत्रीने एकदा ईटाइम्सला सांगितले की, अभिनेत्री बनण्याच्या प्रवासात तिने आपल्या पालकांचा त्याग केला. मल्लिकाने ती हरियाणातील जाट समाजाची असल्याचे सांगितले होते. ज्या दिवशी तिने हिरॉईन बनण्यासाठी घर सोडले त्याच दिवशी तिचे आई-वडील आणि नातेवाईकांशी असलेले नाते संपुष्टात आले. मल्लिका म्हणाली होती की ती ज्या समाजातून येते त्या समाजात हिरॉईन बनण्याचे स्वप्न पाहण्याचे परिणाम तिला माहीत होते.

‘खोट्या दाव्यांवर जिंकलाय’,TMKOC चे निर्माते असित यांची शैलेश लोढांच्या विजयावर प्रतिक्रिया
कुटुंबाला न जुमानता मुंबईचा रस्ता धरला

अभिनेत्री म्हणाली होती, ‘जेव्हा मी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आले, तेव्हा मी माझे कुटुंब गमावले. मी त्यांचा आधार गमावला, त्यांचे प्रेम गमावले. माझा खरोखरच खूप मोठा तोटा झाला. मोठे होत असताना, तुम्ही खूप भोळे असता कारण तुम्ही जगाला तोंड दिलेले नसते. मला वाटले की मी जग जिंकू शकते. मी हरियाणातून आले आहे, जिथे जाट मानसिकता आहे. मी बंड केले आणि सामान बांधून मुंबईला निघाले.

लाडक्या लिटिल चॅम्पची नवी इंनिंग, या मालिकेतून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण
अमिताभ, शाहरुखसोबत काम, हॉलिवूडमध्‍येही नाव

मल्लिका शेरावतने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी काही जाहिराती केल्या होत्या. ती अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसोबत दिसली. नंतर काही म्युझिक व्हिडिओ केले. त्यानंतर ‘जीना सिरफ मेरे लिए’ हा पहिला चित्रपट आला, ज्यामध्ये तुषार कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. पण मल्लिका अगदी छोट्या भूमिकेत होती. त्यानंतर २००३ मध्ये आलेल्या ‘ख्वाहिश’ चित्रपटातून मल्लिका शेरावतची दखल घेतली गेली. पुढे ‘मर्डर’ने तिला स्टार बनवले. मल्लिका शेरावतने अनेक हॉलिवूड चित्रपट देखील केले. अनेक इंटिमेट आणि किसिंग सीनसाठी ती चर्चेत राहिली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *